Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लावणी किंग आशिष पाटीलचा नवा शो; नृत्य, अदा अन् श्रुंगारने नटलेल्या ‘सुंदरी’ शोचा होणार लवकरच श्रीगणेशा

आपल्या नृत्याने, अदेने रसिकांच्या मनात घर करायला हाच लावणी किंग आणि त्याची संपूर्ण टीम 'सुंदरी' या नव्या कोऱ्या शोमधून भेटीस येत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 18, 2025 | 03:13 PM
लावणी किंग आशिष पाटीलचा नवा शो; नृत्य, अदा अन् श्रुंगारने नटलेल्या 'सुंदरी' शोचा होणार लवकरच श्रीगणेशा

लावणी किंग आशिष पाटीलचा नवा शो; नृत्य, अदा अन् श्रुंगारने नटलेल्या 'सुंदरी' शोचा होणार लवकरच श्रीगणेशा

Follow Us
Close
Follow Us:

लावणीचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर येते ती नर्तिकांची मादक अदा, नृत्य आणि नखशिखांत शृंगार. आत्म्याला जणू परमात्म्याशी संवाद साधण्यास भाग पाडणारी कलाही एका लावणी किंग मध्ये अवगत आहे. हो बरोबर ओळखलंत. लावणी किंग म्हणून जगभरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. लावणीच्या दुनियेत स्वतःच हक्काचं स्थान आशिषने निर्माण केलं.

‘टेक इट इझी उर्वशी’ चित्रपटाचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रीमियर…

अशातच आपल्या नृत्याने, अदेने रसिकांच्या मनात घर करायला हाच लावणी किंग आणि त्याची संपूर्ण टीम ‘सुंदरी’ या नव्या कोऱ्या शोमधून भेटीस येत आहे. आशिष पाटीलसह ऋतुजा जुन्नरकर, सुकन्या कालन, निधी प्रभू या नृत्यांगना आपल्या विविधांगी नृत्य कलेने मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाल्या आहेत. येत्या ६ फेब्रुवारीला NMACC मुंबई येथे या शोचा श्रीगणेशा होणार आहे. शिवाय केवळ महाराष्ट्र नव्हे तर जगभरात सुंदरी शोची झलक पाहायला मिळणार आहे. जगभरात आशिष पाटीलच्या लावणीचा चाहतावर्ग आहे. अनेक हिट गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाची धुरा आशिषने उत्तमरीत्या पेलवली आहे. आता ‘सुंदरी’ या नव्या शोमधून उत्तम सादरीकरण घेऊन तो पुन्हा एकदा रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाला आहे.

महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘सौभाग्यवती सरपंच’वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज…

‘नृत्य आशिष’ प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सुंदरी’ या लावणी व कथ्थकची जोड घेऊन आशिष पाटील व टीम सज्ज झाली आहे. या शोची संपूर्ण जबाबदारी आशिष पाटीलच्या ‘कलांगण स्टुडिओ’ने सांभाळली आहे. या शोची कन्सेप्ट, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा आशिष पाटीलने उत्तमरीत्या सांभाळली आहे. याबाबत बोलताना आशिष पाटील म्हणाला की, “‘सुंदरी’ हा शो माझ्यासाठी एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. मी आणि माझी टीम जगभरात या शोमार्फत रसिकांपर्यंत पोहचणार आहोत. कथ्थक व लावणीचे योग्य समीकरण या शोमार्फत रसिकांना पाहायला मिळणार आहे. मला आशा आहे की या शोला प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळेल”.

Web Title: Marathi lavni show coming soon at neeta mukesh ambani cultural center in sundari show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Lavni
  • marathi show

संबंधित बातम्या

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!
1

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट
2

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर
3

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

नृत्यांगणास गुलाबाचे फुल दिले अन्…; लावणी कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी
4

नृत्यांगणास गुलाबाचे फुल दिले अन्…; लावणी कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.