Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

महिला सशक्तीकरणावर आधारित नुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रदर्शित करणार आहेत. प्रेक्षकांना या तिन्ही लघुपटाचा आनंद घेता येणार आहे. या लघुपटामध्ये स्त्रियांची वेगवेगळी कथा नव्या स्वरूपात अनुभवायला मिळणार आहे. अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांना ऑनलाईन पाहता येणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 11, 2024 | 03:46 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

सर्वत्र नवरात्रोत्सवाचं मंगलमय वातावरण सुरु आहे. याचं नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अनुश्री फिल्म्स प्रस्तुत ‘देवी’, ‘त्या दोघी’ आणि ‘शालिनीझ होम किचन’ असे तीन वैचारीक लघुपट प्रदर्शित करणार आहेत. नवरात्राच्या पवित्र पर्वावर देवीची आराधना, तिची शक्ती आणि भक्तिरस यांचा अनुभव तुम्हाला या लघुपटांत पाहायला मिळणार आहे. तिन्ही शॉर्ट फिल्म्सचे विषय हे वेगळे असून प्रत्येकातून एक वेगळा संदेश दिला जात असल्याचे दिसून येते. या लघुपटांची निर्मिती मयुर तातुसकर यांनी केली आहे. तर लघुटांचे लेखन आणि दिग्दर्शन शुभम घाटगे यांनी केले आहे.

‘देवी’ या लघुपटात अमृता सुरेश, सौज्ञा उपाध्ये तर ‘त्या दोघी’ या लघुपटात ऐश्वर्या वखरे, सायली गीते, केशव देशपांडे आणि ‘शालिनीझ होम किचन’ या लघुपटात सुरभी ढमाळ, सौरभ अहिर, कुमार पाटोळे या उत्तम कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटांचे छायाचित्रण अविरत पाटील यांनी केले आहे. तसेच कला दिग्दर्शन पीयूषा चाळके यांनी केले आहे , ध्वनी श्रेयस किराड व तुषार कांगरकर व सहायक दिग्दर्शन अमिताभ भवार व कार्यकारी निर्मिती पराग जाधव यांनी केली आहे.

अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयुर तातुसकर लघुपटांच्या संकल्पनेविषयी म्हणाल्या की, “स्त्री शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या कालावधीत तीन शॉर्ट फिल्म्स निर्माण करणे हे त्याच उद्देशाशी संबंधित आहे, कारण या काळात महिला सशक्तीकरणाचा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो. आम्ही या सणाच्या माध्यमातून प्रेम, धार्मिक महत्व, साहस, भक्ती आणि प्रेरणा यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या शॉर्ट फिल्म्सची संकल्पना मी आणि माझे मित्र शुभम घाटगे ज्यांनी अनुश्री फिल्म्सच्या मागील भाव भक्ती विठोबा या लोकप्रिय गाण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या सोबत या नवरात्र उत्सवात जागर स्त्री शक्तीचा हा विषय विचारात घेऊन अंमलात आणताना वेगवेगळ्या विचारधारा आणि कथा एकत्र करून आम्ही ज्या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. त्यावर चर्चा सुरू झाली आणि यामुळे या तीन कथा विकसित झाल्या.” असे त्यांनी सांगितले.

 

हे देखील वाचा- टीव्हीवरील संस्कारी सून रुबिना दिलैकने रॅम्पवर केला कहर, फेकली चप्पल अन्…

लेखक – दिग्दर्शक शुभम घाटगे लघुपटांच्या चित्रीकरणाविषयी म्हणाले की, “देवी या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पाषाण येथील सोमेश्वर मंदिर या खास आणि सुंदर ठिकाणी केले आहे, जिथे नवीनीकरण, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम आहे. तर त्या दोघी आणि शालिनीझ होम किचन या लघुपटांचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले. चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय होता, तसेच कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीमुळे आम्हाला अत्यंत सजीव आणि प्रभावी चित्रण मिळाले. प्रत्येक क्षणामध्ये गहनता आणि भावना होती, ज्यामुळे हा अनुभव मनाशी बांधला गेला. प्रेक्षकांना हे तिनही लघुपट भावतील अशी मी आशा करतो.” असे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना हे तिन्ही लघुपट युट्युबवर पाहता येणार आहेत.

Web Title: Anushree films which awakens womens power during navratri festival is presenting three short films for the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • short film

संबंधित बातम्या

रेणुका शहाणे दिग्दर्शित मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival सादर होणार
1

रेणुका शहाणे दिग्दर्शित मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival सादर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.