Subodh Bhave and Tejashri Pradhan on audience expectations: वीण दोघांतली ही तुटेना या नव्या मालिकेबाबत सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या मुलाखतीत मालिका आणि मालिकेशीसंबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं होतं. याबाबत तेजश्री आणि सुबोध यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. सुबोध आणि तेजश्री हे कलाकर असे आहेत जे सिनेमा आणि मालिका या दोन्ही विश्वात प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे.
मागच्याच वर्षी तेजश्रीने स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता नावाची मुख्य भूमिका साकारली होती. मात्र काही कारणांमुळे तीने ही मालिका सोडली. याचा संदर्भ जोडत तेजश्री आणि सुबोधला काही प्रश्न विचारण्यात आले होते. नवी मालिका किंवा सिनेमा साकारताना आधी केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलेलं असतं त्यामुळे याचं दडपण येतं का ?
काय म्हणाली तेजश्री प्रधान ?
आपण ज्या मालिकेत किंवा सिनेमात काम करतो त्याला रसिक माय बाप प्रेक्षकांचं प्रेम मिळावं अशी प्रत्येक कलाकााची इच्छा असते. आपण आधी जे काम केलेलं असतं त्या कामामुळे प्रेक्षक आपल्याला भरभरुन प्रेम देतात. तेव्हा एक जाणीव असते की यापुढचं काम आपल्याला चांगलच करायचं आहे. त्यामुळे नव्या संधी येतात तेव्हा मला खूप दडपण येतं की माझ्याकडून आधीपेक्षा आताचं काम चांगलं व्हायला पाहिजे आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांचं दडपण येतं म्हणूनच मी चांगलं काम करु शकते. हे येणारं दडपणच मला माझ्या जबाबदऱ्यांची जाणीव करुन देतं असं मत तेजश्रीने मांडलं आहे.
याचउलच सुबोध भावेचं या प्रश्नावर मात्र वेगळं उत्तर होतं. सुबोध म्हणाला की, मला कोण काय म्हणतंय याने फरक नाही पडत. माझ्या हातात मी माझे शंभर टक्के कसे देतोय हे आहे. एखादा सिनेमा किंवा मालिका सुपरहिट होणं माझ्या हातात नाही. जे माझ्यात हातातच नाही त्याचं दडपण मी का घेऊ? मी फक्त माझ्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि लेखकांना बांधील आहे. त्यांना माझं काम योग्य वाटणं मला गरजेचं वाटतं आणि मी त्याकडेच जास्त लक्ष देतो, असं सुबोध भावेनी सांगितलं आहे. छोट्या पडद्यावर सुबोध प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर आहेच त्याचबरोबर सुबोधचा नवा सिनेमा देखील लवकरच येत आहे. बेटर हाफची लव्ह स्टोरी या सिनेमात सुबोध मुख्य़ भूमिकेत झळकणार आहे. याबाबात देखील त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.