सईने तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' केली साजरी (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
या दिवाळी पहाटला सईची आई मृणालिनी ताम्हणकर यांनी देखील आवर्जुन उपस्थिती दर्शवली होती. याशिवाय सईच्या 'मानवत मर्डर्स' ची टीम दिग्दर्शक आशिष बेंडे, गिरीजा ओक गोडबोले, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग आणि यांच्यासह अभिनेत्रीच्या जवळची इतरही काही कलाकार मंडळी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' या मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्यावर्षीपासून सई या घरी वास्तव्यास आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्येही तिने खास दिवाळी पहाटसाठी सांगितिक मेजवानी आयोजित केली होती यंदाही अभिनेत्रीने ही परंपरा सुरू ठेवली.
सईच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावेळी लोकप्रिय सतारवादक मेहताब अली नियाझी उपस्थित होते. तर त्यांना तबला वादनासाठी खुर्रम अली नियाझी यांची साथ मिळाली.
अभिनेत्रीने या कार्यक्रमाची झलक इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केली आहे. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त या सर्वांना तबला आणि सतारच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता आला.
सई ने सोशल मीडियावर या दिवाळी पहाटचे खास फोटो शेयर केले असून तिच्या लूक बद्दल देखील चर्चा होत आहे. अगदी साधा सिंपल लूक असला तरी यात सई एकदम कमाल आणि सुंदर दिसून येत आहे.
सईने तिने फ्लॉरल अनारकली ड्रेसला पसंती दिली असून त्यावर उठावदार नेकलेस परिधान केला आहे. दरम्यान दिवाळी पार्टीच्या ट्रेंड मध्ये अशाप्रकारच्या पारंपरिक दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सोशल मीडियावर सईच कौतुक देखील होत आहे.