Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाली कुलकर्णीने ‘मानवत मर्डर्स’ मधील भूमिकेबद्दल व्यक्त केले मत, म्हणाली “मोठी जबाबदारी मिळाली”

मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच आगामी सिरीज ‘मानवत मर्डर्स'मध्ये दिसणार आहे. या सिरींजमधील अभिनेत्रींचे पात्र खूप वेगळे असणार आहे. याचदरम्यान सोनाली कुलकर्णीने या भूमिकेबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. तिला हे पात्र साकारताना मोठी जबाबदारी पार पाडली असे वाटले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2024 | 03:14 PM
सोनाली कुलकर्णीने ‘मानवत मर्डर्स’ मधील भूमिकेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीने ‘मानवत मर्डर्स’ मधील भूमिकेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनी लिव्‍हवरील आगामी मराठी ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मधील स्‍टार-स्‍टडेड कलाकारांबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत आहेत. ही रोमांचक थ्रिलर सिरीज १९७०च्‍या दशकात महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागात घडलेल्‍या कुप्रसिद्ध हत्‍याकांडाला प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकारांसह राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते कलाकार देखील आहेत.

अभिनेत्री सोनालीने या सिरीजमध्ये रूक्मिणीचे पात्र साकारले आहे. भूमिकेत अभिनेत्रीने आपली सखोलता आणि सर्वोत्तम अभिनयाची भर टाकली आहे. रुक्मिणी आपल्‍या पूर्ण न झालेल्‍या इच्‍छांची पूर्तता करण्‍यासाठी विलक्षण, घातक उपाययोजनांचा अवलंब करते. तिच्‍या प्रवासाबाबत सांगताना सोनाली म्हणाली की, “ही भूमिका ऑफर करण्‍यात आल्‍यापासून आणि कथानक वाचल्‍यापासून मी या भूमिकेची सखोलता आणि मानवी मन कशाप्रकारे विलक्षण कृत्‍य करू शकते हे पाहून अचंबित झाले. ही भूमिका साकारताना मोठी जबाबदारी पार पाडत असल्‍यासारखे वाटले. मी रूक्मिणीचे पैलू परिपूर्णपणे सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले.

सोनाली प्रतिभावान दिग्‍दर्शक आशिष बेंडे आणि सह-कलाकार आशुतोष गोवारीकर, सई ताम्‍हणकर आणि मकरंद अनासपुरे यांच्‍यासोबत काम करण्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत म्हणाली, “या सर्वांमध्‍ये अनोखी कौशल्‍ये आणि सर्जनशीलता आहे. ही उत्तम टीम आहे आणि या टीमने माझ्या भूमिकेमध्‍ये अधिक रोमांचची भर केली आहे. मी या लक्षवेधक कथानकाप्रती प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

हे देखील वाचा- ‘लापता लेडीज’ची ऑस्करसाठी निवड होऊनही ‘मंजू माई’ नाराज? अभिनेत्रीला ‘या’ गोष्टीचे वाटले वाईट!

स्‍टोरीटेलर्स नूक (महेश कोठारे व आदिनाथ कोठारे) निर्मित आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मानवत मर्डर्स’चे दिग्‍दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्‍मचरित्रात्‍मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित या सिरीजमध्‍ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हि सिरीज येत्या ४ ऑक्‍टोबरला सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sonali kulkarni reflects on her role in manvat murders says given a big responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • sonali kulkarni
  • Sony Liv

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.