Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा टीझर आऊट

वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी या दोघांची लोव्हस्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. जिओ स्टुडिओच्या "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 18, 2024 | 04:51 PM
वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा टीझर आऊट
Follow Us
Close
Follow Us:

अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच “एक दोन तीन चार” या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे ह्याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते. आता हा हॅपिनेस चा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे, हे आपल्याला येत्या १९जुलै लाच समजेल.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर हे उत्कृष्ट कलाकर पाहायला मिळणार आहे. इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने “एक दोन तीन चार” हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण नार्वेकर हा एक चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आहे. ज्यांनी औध (२०१४) या लघुपटाचे लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच या चित्रपटामध्ये सम्या आणि सायलीच्या भूमिकेत असणारे वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत.

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीने जग्गू आणि ज्युलिएट, झोंबिवली आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड यासारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपट केले आहेत. तसेच तिने बॉलीवूड मध्ये सिम्बा आणि वजीर हे चित्रपट सुद्धा केले आहेत. तसेच ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात महत्वाची भूमिका करणारा निपुण धर्माधिकारी हा एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याचबरोबर त्याचा बॉलीवूड मधील ‘इश्क विश्क रिबॉउंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Teaser out of jio studios ek don tin char directed by varun narvekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 04:51 PM

Topics:  

  • jio studios

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.