Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’ लग्नसोहळा चा महासप्ताह

मराठी अभिनेत्री रश्मी अनपट हि सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'अंतरपाट' या नव्याकोऱ्या मालिकेमध्ये दिसत आहे. या माव्या मालिकांचा चाहता वर्गसुद्धा वाढला आहे. आता या मालिकांमध्ये नुकताच गौतमी आणि क्षितिज लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 27, 2024 | 03:49 PM
महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’ लग्नसोहळा चा महासप्ताह
Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडताना दिसणार आहे. या लग्नसोहळ्याचं विशेष आकर्षण गोष्ट पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरांगत चालत आलेले लोकसंगीत हा महिके मध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ‘अंतरपाट’ मालिकेत पारंपरिक लग्नसोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं अनोखं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा हा वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजला आहे. बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची असलेली इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस अनोख्या पद्धतीने सजवण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मऱ्हाठमोळ्या पद्धतीने गौतमी- क्षितिजचा हा विवाहसोहळा पार पडतोय याचा आनंद गौतमीला अधिक झालेला दिसून येत आहे. मराठी मातीतील संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीने हा लग्नसोहळा साजरा करण्यात येणार आहे.

आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच झाली आहे. पण महाराष्ट्राच्या या गतवैभवाला ‘अंतरपाट’ या मराठी मालिकेने लग्नसोहळ्याच्या निमित्ताने या सगळ्याला उजाळा दिला आहे. क्षितिज आणि गौतमीच्या लग्नात कोणताही दिखावा न करता लोककलेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करण्यात आले असून, ‘दादला नको गं बाई’ हे भारूड, ‘धरिला पंढरीचा चोर’सारख्या गीतांचा समावेश या लग्न सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आधीच्याकाळी लग्नसोहळ्यात मराठमोळ्या परंपरेचा आणि लोककलेचा समन्वय दिसत असे परंतु ते आज मात्र कुठेतरी हरवत चालले आहे. लोककलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलर्स मराठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘अंतरपाट’ मालिकेतील रश्मी अनपट आणि अक्षय ढगे हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. त्यांच्या भूमिकांसह पारंपरिक वेशभूषेमुळे लग्नसोहळा अधिकच उठून दिसतो आहे.

 

Web Title: The epic episode of the antarpat wedding ceremony is colored by the folk songs of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • Colours Marathi

संबंधित बातम्या

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य
1

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.