Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?

प्रदिप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ हे मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं २६ वर्षांपासूनचं हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 06, 2024 | 03:15 PM
‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?

‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?

Follow Us
Close
Follow Us:

प्रदिप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ हे मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै १९९८ साली पार पडला होता. तर शेवटचा प्रयोग २५ ऑगस्ट २०२४ रोजी… तब्बल २६ वर्षांचा प्रयोग संपला असून आता हे नाटक प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे, पण ते हिंदी भाषेमध्ये… मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे.

“ “मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस पुन्हा आला… तो सुद्धा…” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मराठमोळ्या गायकाची खास पोस्ट

‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ हे बहुचर्चित नाटक मराठीतून हिंदीत यावं यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर आणि लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५ डिसेंबरला दुपारी २.३० वा. आणि सायं.५.३० वा. पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार आहे. मराठीतील हे नाटक हिंदीमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचे रूपांतर करण्यात आले आहे. यातील नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांसोबत भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर यांनी सांभाळली आहे.

“चैत्यभूमीच्या किनारी सागर गहिवरलेला, मानवतेचा महामानव आज…” महापरिनिर्वाण दिनी मराठमोळ्या अभिनेता महामानवासाठी खास कविता

‘मराठीव्यतिरिक्त इतर भाषिक जे प्रेक्षक आहेत, त्यांनाही महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे जाणून घेता येईल. ‘गांधीजींना मानणारा ते त्यांचा मारेकरी’असा नथुराम गोडसे यांचा प्रवास या नाटकाच्या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निर्माते परितोष पेंटर आणि लेखक, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी सांगितले. शरद पोंक्षे यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचं लेखन प्रदीप दळवी यांनी केलं असून विनय आपटे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर ८१७ व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरला. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं.

Web Title: Mee nathuram godse boltoy popular play marathi theatre this play which has been popular on marathi theatre for 26 years is now ready to entertain theatre lovers on hindi theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 03:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.