"चैत्यभूमीच्या किनारी सागर गहिवरलेला, मानवतेचा महामानव आज..." महापरिनिर्वाण दिनी मराठमोळ्या अभिनेता महामानवासाठी खास कविता
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी. ६ डिसेंबर १९५६ रोजी अवघ्या जगाला ते पोरकं करुन निघून गेले. या महामानवाने देशासाठी आणि देशातल्या माणसांसाठी अनेक असामान्य अशी काम केली आणि त्यांचे आयुष्य सुंदर बनवले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे, ते भारताचे पहिले केंद्रीय कायदेमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
“शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा !” अभिनेता किरण मानेंची पोस्ट व्हायरल
अशा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून त्यांना अभिवादन केले जात आहे. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत अभिनेता अंशुमन विचारेने एक कविता शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या कवितेतून अभिनेत्याने महामानवाला अभिनवादन केले आहे. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर अभिनेत्याने व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने, “माणसाला माणूसपण दाखवणाऱ्या महामानवाला ‘महापरिनिर्वाण दिनी’ कोटी कोटी प्रणाम” असं कॅप्शन दिले आहे.
व्हिडिओमध्ये अंशुमनने कवी विक्रांत केदारेंची कविता म्हणाला आहे. “चैत्यभूमीच्या किनारी सागर गहिवरलेला, मानवतेचा महामानव आज शांत निजलेला…” पुढे म्हणतो, “आसवांचा पुर आला, जनी आक्रोश सारा… हाक देती थांब बाबा, तुझ्याविना नाही थारा… अंधाऱ्या विश्वात या तू, सुर्य आम्हा दिसलेला… अनाथ झालो आज पुन्हा मी, हात तुझा सुटलेला… चैत्यभूमीच्या किनारी सागर गहिवरलेला, मानवतेचा महामानव आज शांत निजलेला…” महापरिनिर्वाण दिनी विचारे कुटुंबियांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन… असा अभिनेता व्हिडिओमध्ये म्हणालाय.
अभिषेक आणि ऐश्वर्या अखेर बऱ्याच दिवसांनी दिसले एकत्र, घटस्फोटाच्या अफवांना मिळाला पूर्णविराम!
सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. अंशुमन विचारेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून ‘वस्त्रहरण’ आणि ‘पाहिले न मी तुला’ या दोन नाटकांमुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘पाहिले न मी तुला’ नाटकाचे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांत प्रयोग पार पडत आहे.