Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, ‘त्या’ खुणाचा पोलिस कसा लावणार छडा

बॉलिवूडमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलर जॉनरचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडतात. नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यासोबतच या वर्षातील पहिल्या म्युझिकल थ्रिलर चित्रपट 'मिशन ग्रे हाऊस'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 05, 2025 | 04:10 PM
Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, 'त्या' खुणाचा पोलिस कसा लावणार छडा

Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, 'त्या' खुणाचा पोलिस कसा लावणार छडा

Follow Us
Close
Follow Us:
बॉलिवूडमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलर जॉनरचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडतात. नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यासोबतच या वर्षातील पहिल्या म्युझिकल थ्रिलर चित्रपट ‘मिशन ग्रे हाऊस’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी ‘मिशन ग्रे हाऊस’ चित्रपटात मुख्य भूमिका करणारे युवा अभिनेता अबीर खान, अभिनेत्री पूजा शर्मा आणि प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची बहीण अभिनेत्री निखत खान यांनी आपली उपस्थिती नोंदवली. अबीर खान ‘मिशन ग्रे हाऊस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

“हम भी घुसकर मार सकते है…”, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्ट ‘स्काय फोर्स’ मध्ये दिसणार; दमदार ट्रेलर प्रदर्शित

ह्या ट्रेलर ची सुरुवात अंधाऱ्या रात्री निर्जन एरिया मध्ये “हे रहस्यमय राखाडी घर आहे” अशा आवाजा मध्ये सुरु होत आहे.  2 मिनिट 13 सेकंदाच्या या ट्रेलर मध्ये पांढरा टी-शर्ट घातलेला एक मध्यमवयीन माणूस दिसतो, त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर भीती दिसत होती. अचानक घराच्या दारात एक गूढ माणूस दिसतो जो डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे झाकलेला असतो आणि त्याच्या हातात एक भिंग दिसते. पार्श्वभूमीत भितीदायक संगीत ऐकू येत आहे. त्या नंतर गूढ माणसाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचा गळा चिरताना दिसत आहे. पुढच्या सीनमध्ये अभिनेता राजेश शर्मा अभिनेता किरण कुमारशी फोनवर ग्रे हाऊसबद्दल बोलतांना दिसत आहे. यानंतर, कबीर राठोड म्हणजेच अबीर खान, मोटारसायकलवर पोलिसांच्या गणवेशात, कारमध्ये बसलेल्या गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांशी लढताना दिसत आहे. पुढच्याच सीनमध्ये रझा मुरादची स्विमिंग पूलजवळ क्रूरपणे हत्या होताना दिसत आहे. यशपाल शर्माने कबीर कबीर राठोर ला ग्रे हाऊसमध्ये होणाऱ्या खुनाचा शोध लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर अबीर खान तपासात गुंततो, या दरम्यानच्या संघर्षांमध्ये होणारे  चढ-उतार, मारामारीचे दृश्य आणि खून, तसेच वेगाने बदलणारी परिस्थिती ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, ‘मिशन ग्रे हाऊस’ चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. आणि हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ग्रे हाऊसमध्ये होणाऱ्या हत्यांमागील गूढ उलगडणार आहे. नौशाद सिद्दीकी द्वारा दिग्दर्शित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती रफत फिल्म्स एंटरटेनमेंट ने केली आहे. चित्रपटाचे संगीत एच. रॉय यांनी दिले आहे तर कथा ज़ेबा के. यांनी लिहिले आहे.
या चित्रपटात तरुण पोलीस अधिकारी कबीर राठोरची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अबीर खान त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये खूप उत्सुक दिसत होता. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “चित्रपटाच्या कथेत खूप गूढ आहे. दमदार ॲक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटातून आम्ही प्रेक्षकांसमोर मनोरंजनाची एक नवीन संकल्पना मांडणार आहोत. या चित्रपटातील रोमांचक कथा पडद्यावर सादर करण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

धक्कादायक! क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, दोनदा चाकूनं वार अन् डोक्यात लोखंडी रॉडने वार

सुपरस्टार आमिर खानची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री निखत खान ट्रेलर लाँचच्या वेळी थिएटरमध्ये उपस्थित होती. या चित्रपटातील त्यांच्या  भूमिकेबद्दल सांगताना म्हणाल्या “सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवणे सोपे काम नाही. प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटात गूढ रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी क्लायमेक्स पर्यंत वाट पाहावी लागणार, प्रेषकआपली सीट सोडणार नाहीत याची खात्री आहे.

अबीर खानसोबत, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित ‘मिशन ग्रे हाऊस’ या चित्रपटातून पूजा शर्मा देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ॲक्शन आणि थ्रिलर असण्यासोबतच हा एक संगीतमय चित्रपट आहे ज्यामध्ये सुखविंदर आणि शान सारख्या मोठ्या गायकांनी गाणी गायिली आहेत. लोणावळा आणि पुणे या सुंदर लोकेशन्सवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे हा चित्रपट याच महिन्यात १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mission grey house trailer out a gripping thriller promising suspense and intense action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 04:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.