Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या ‘ढाई आखर’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

इंडस्ट्रीतील सुंदर आणि सालस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेत्रीच्या 'ढाई आखर' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 06:04 PM
पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या 'ढाई आखर' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या 'ढाई आखर' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

मराठी इंडस्ट्रीतील सुंदर आणि सालस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नवनवीन प्रोजेक्टमुळे कमालीची चर्चेत आहे. ‘गुलाबी’, ‘पैठणी’ आणि आता ‘ढाई आखर’ चित्रपटामुळे अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच ‘ढाई आखर’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

हे देखील वाचा – हार्दिक पांड्याच्या घटस्फोटावर नतासा स्टॅनकोविकने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली ‘आमचा मुलगा नेहमीच…’

प्रवीण अरोरा दिग्दर्शित ‘ढाई आखर’ चित्रपटाचे लेखन अमरीक सिंह दीप यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक ‘तीर्थाटन के बाद’ कादंबरीवर आधारित आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे तर, प्रेम, भावना आणि नात्यातील भावनांची गुंतागुंत उत्तम मांडण्याचा प्रयत्न चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. एक महिला स्वत:ची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करताना आणि जखडताना दिसत आहे. यासोबतच ती ओळख शोधताना प्रेमाच्या कोमल भावनांचाही अनुभव घेताना दिसते. ट्रेलरमधील काही संवाद हृदयाला भिडणारे आहेत. “तुमचं आमचं नातं काय आहे?” यावर उत्तर येतं, “नात्याला नाव असणं गरजेचं आहे का?” तसेच “अनोळखी पुरुषासोबत लग्न करणे, त्याच्यासोबत संभोग करणे आणि त्याच्या अंशाला आपल्या गर्भात वाढवणे पाप आहे,” अशा संवादातून दुःख आणि वेदनाही दिसून येतात.

ट्रेलरच्या शेवटी, “जिथं बंधन असतं, तिथं प्रेम नसतं, आणि जिथं प्रेम असतं, तिथं बंधन नसतं,” हा संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. या २ मिनिटे ४० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि मानवी नात्याची कथा प्रभावीपणे सांगितली जाते. “तुम मुखातिब भी हो और करीब भी, तुमको देखे कि तुमसे बात करे” ही शायरी देखील लक्षात राहते. या चित्रपटाचे संवाद असगर वसाहत यांनी लिहिले असून, गीतकार इरशाद कामिल यांचे गाणेही चित्रपटात आहेत. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ‘ढाई आखर’ या चित्रपटात ‘हर्षिता’ च्या भूमिकेत दिसणार आहेत. इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता हरीश खन्ना आणि मराठमोळा अभिनेता रोहित कोकाटे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा – पुरुषोत्तम बेर्डे यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर, लोककलेच्या शिलेदारांचा होणार सन्मान

‘ढाई आखर’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांनी लिहिले आहेत. या उत्कृष्ट चित्रपटाच्या टीममध्ये गीतकार इरशाद कामिल, हिंदी आणि बंगाली संगीत दिग्दर्शक अनुपम रॉय आणि गायिका कविता सेठ यांचा समावेश आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर गेल्या वर्षी झालेल्या IFFI पुरस्कार सोहळ्यात झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘ढाई आखर’ 22 नोव्हेंबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mrinal kulkarni to play lead role in asgar wajahat written movie dhai aakhar based on novel tirthatan ke baad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 06:04 PM

Topics:  

  • mrinal kulkarni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.