• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Mrudgandha Jivangaurav Puraskar Award 2024 Declared

पुरुषोत्तम बेर्डे यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर, लोककलेच्या शिलेदारांचा होणार सन्मान

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा 'मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 05:09 PM
पुरुषोत्तम बेर्डे यांना यंदाचा 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' जाहीर, लोककलेच्या शिलेदारांचा होणार सन्मान

पुरुषोत्तम बेर्डे यांना यंदाचा 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' जाहीर, लोककलेच्या शिलेदारांचा होणार सन्मान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे.

हे देखील वाचा – जगप्रसिद्ध सारंगी वादक पंडित राम नारायण यांचं निधन, वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार), सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र), श्रीगौरी सुरेश सावंत (सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालक), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.

हे देखील वाचा – कंगना रणौतच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचे झाले निधन!

बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं.विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

हे देखील वाचा – “माझं नाव, परिचय सांगितला आणि…” प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक…

आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर

पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Web Title: Mrudgandha jivangaurav puraskar award 2024 declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 05:09 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.