नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा विवाहसोहळा ओटीटीवर पाहता येणार, ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल कोट्यवधी रुपये
समांथा रुथ प्रभू आणि नागाचैतन्य यांनी २०२१ मध्ये एकमेकांसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर आता नागाचैतन्यने तीन वर्षांनंतर लवकरच खासगी आयुष्यातील नवा अध्याय सुरू करणार आहे. नागाचैतन्य आणि शोभिता धुलिपाला गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ऑगस्ट महिन्यात गुपचूप साखरपुडा आटोपला. त्यानंतर आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अभिनेता नागाचैतन्य ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केला असून लग्नासाठी ते दोघेही खूपच एक्सायटेड असल्याचं म्हणाले आहे.
सलमान खान आणि ॲटली कुमार २०२६ मध्ये घालणार धुमाकूळ; ‘A6’ चित्रपटाबाबत समोर आले खास अपडेट!
आज २३ नोव्हेंबर, टॉलिवूड अभिनेता नागाचैतन्य ह्याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. वाढदिवशी अभिनेत्याने ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने नव्या अध्यायासाठी आम्ही दोघेही उत्सुक असल्याचे सांगितले. मुलाखतीत नागाचैतन्य म्हणतो, “मला स्वत:चा वाढदिवस सेलिब्रेट करायला आवडतो. पण तोही साध्या पद्धतीने. माझ्या वाढदिवशी मला जवळच्या मित्रांसोबत आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करायला आवडतो, मला माझ्या गोष्टी करायला आवडतात. माझं असं म्हणणं असतं की, काही काळासाठी स्वत:ला वेगळे ठेवणे, स्वत:च्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे आणि आपल्या मनाला रिचार्ज करणे. यावेळीही मी तेच करत आहे आणि गोव्यात माझ्या जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.”
पुढे मुलाखतीत नागा चैतन्यला जेव्हा विचारले की, सोभिता धुलिपालाने तुझ्या वाढदिवसासाठी काय नियोजन केले आहे ? तेव्हा तो म्हणाला, “ती सर्व प्लॅनिंगची कामं माझ्यावर सोडते. ती मरेपर्यंत तुझ्यासोबत असेल. हे माझ्यासाठी पुरेसे आह.” येत्या ४ डिसेंबरला हे जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. याबद्दल अभिनेताही बोलला. “लग्नाची चिंता नसल्याचे सांगितले. मी खूप उत्साहित आहे. पोटात फुलपाखरे उडत आहेत. आमचं लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होणार आहे. त्या स्टुडिओसोबत आमच्या खास भावना जोडलेल्या आहेत. त्या स्टुडिओमध्ये माझ्या आजोबांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोर लग्न करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते. आमचे कुटुंब हे लग्न एकत्र येऊन करण्यास उत्सुक आहेत.”
चित्रपट आणि लग्न ह्या दोन्हीही गोष्टी तू कशा हाताळणार असा प्रश्न विचारला असता नागाचैतन्य म्हणाला, “सध्या मी ‘तांडेल’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. पण जवळपास चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली आहे. आमच्याकडे शूटिंगसाठी सात दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत आणि तेही या महिन्यात पूर्ण होणार आहेत. पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सेलिब्रेशनला सुरुवात होईल. काही कौटुंबिक बांधिलकी देखील असेल. त्यानंतर मी पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरुवात करेन. डबिंग आणि प्रमोशनची कामे मी सांभाळणार आहे. त्यामुळे सर्वकाही सहजतेने संतुलित होईल, असा विश्वास आहे.” नागा चैतन्य स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुढे म्हणाला, ‘शोभितासोबत माझा नवीन प्रवास सुरू करायला आणि एकत्र आयुष्य घालवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी तिच्याशी खूप कनेक्ट होतो, ती मला खूप समजून घेते. माझ्यातील ती उणिवा पूर्ण करते. पुढचा प्रवास खूप छान असणार हे नक्की…”