बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये दावा केला आहे की राज कुंद्राने मुंबईजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील चित्रपट शूट केले आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकले. एवढेच नाही तर राज कुंद्राने या डीलमधून कोट्यावधींची कमाई केल्याचीही बाब समोर आली आहे.
[read_also content=”ठेकेदार, लेखापरीक्षांमध्ये हाणामारी ; प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील प्रकार https://www.navarashtra.com/maharashtra/clashes-between-contractors-audits-nrab-346928.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सेलने राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, फिल्ममेकर मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांच्या विरोधात 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बनाना प्राइम ओटीटीचे सुवाजित चौधरी आणि राज कुंद्राचा कर्मचारी उमेश कामथ यांचीही लंडनस्थित कंपनी ‘हॉटशॉट’मध्ये व्यवस्थापक म्हणून नावे आहेत. इतकंच नाहीत तर सुवाजित चौधरी आणि उमेश कामथ यांच्यावर अश्लील कंटेंट असलेली ‘प्रेम पगलानी’ ही वेबसीरिज बनवून ओटीटीवर अपलोड केल्याचा आरोप आहे.
[read_also content=”अरुण गोयल देशाचे नवे निवडणूक आयुक्त, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती https://www.navarashtra.com/india/arun-goyal-appointed-as-the-countrys-new-election-commissioner-ahead-of-gujarat-elections-nrgm-346940.html”]
तर, या सगळ्या प्रकरणात पूनम पांडेंही पोलिसांच्या रडारवर आहे. पूनम पांडेंने तिच्या स्वतःचे मोबाईल अॅप ‘द पूनम पांडे’ विकसित करणे, व्हिडिओ शूट करणं, अपलोड करणं आणि प्रसारीत करणं हे सर्व राज कुंद्राच्या कंपनीच्या मदतीने केल्याचा आरोप आहे. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅमेरामन राजू दुबेने शर्लिन चोप्राचे व्हिडिओ देखील शूट केले होते, तर झुनझुनवालाला कथा लिहिण्यात आणि दिग्दर्शित करण्यात तिला (शार्लिन चोप्रा) मदत केल्याचा आणि प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर ‘हॉटशॉट’ ही कंपनी राज कुंद्राचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्या ‘केनिन’ या कंपनीच्या मालकीची आहे, जी यूकेमध्ये नोंदणीकृत आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस या प्रकरणात अजूनही काही मॉडेल्सचा शोध घेत आहेत, ज्यांनी बोल्ड चित्रपटांमध्ये काम केले आहे.