फोटो सौजन्य - Social Media
नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत, जिथे त्या “नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) इंडिया वीकेंड”च्या तयारीत व्यस्त आहेत. नुकतेच या आई-मुलीच्या जोडीने प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या न्यूयॉर्कमधील ‘Bungalow’ या रेस्टॉरंटला भेट दिली, जिथे त्यांनी आपल्या साध्या पण एलिगंट स्टाइलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
नेहमी फॅशनच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या अंबानी कुटुंबाने यावेळी ‘नो मेकअप’ आणि ‘कॅज्युअल एलिगन्स’चा अंदाज सादर केला. नीता अंबानी लाइट ग्रीन फ्लोरल प्रिंट असलेल्या साटन नाईटसूटमध्ये तर ईशा अंबानी साध्या टी-शर्ट आणि जिन्समध्ये दिसून आल्या. या लूकमध्ये कोणताही झगमगाट न करता फक्त सौम्य ग्लो आणि क्लासिक लुकने त्यांनी स्टाईलची नवी व्याख्या सादर केली.
ईशा अंबानीने ब्लॅक आणि ऑफ-व्हाईट स्ट्राइप्स असलेला क्रू नेक टॉप परिधान केला होता, ज्यावर त्यांनी मॅचिंग क्रॉप्ड फुल स्लीव्स जॅकेट घातलं होतं. याला पेअर करत त्यांनी हलक्या निळ्या रंगाची हाय-राईज मॉम फिट जिन्स निवडली. पायात ग्रीन आणि ब्लॅक कलरचे बैलेरीना फ्लॅट्स होते. त्यांच्या चेहऱ्यावर ड्यूई मेकअप, ब्राउन लिप ग्लॉस, फ्लश्ड चीक्स आणि डार्क आयब्रोचा सौंदर्य लुक होता. खुले केस आणि सेंटर पार्टिंगने त्यांचा लुक अधिक मोहक दिसत होता.
दुसरीकडे, नीता अंबानीने नॉच कॉलर असलेला बटण डाउन फ्लोरल साटन नाईटसूट घातला होता. याला मॅचिंग फ्लेयर्ड पँट्ससह पेअर करत त्यांनी डायमंड स्टड इयररिंग्स, वॉच आणि काही अंगठ्या परिधान केल्या होत्या. त्यांच्या लूकला ओपन हेअर आणि नो मेकअपने एक परिपूर्ण एलिगंट टच दिला. या दोघींनी दाखवून दिलं की फॅशनसाठी भडक रंग, चमकदार ज्वेलरी किंवा भरपूर मेकअप आवश्यक नाही. साधी रंगसंगती, आरामदायक पोशाख आणि आत्मविश्वास हाच खरा फॅशन आहे – हेच त्यांच्या लुकमधून अधोरेखित झालं.