
Yash chopra wife Pamela chopra passes away : यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नीचं आज सकाळी लीलावती रुग्णालयात निधन झालं. पामेला चोप्रा (Pamela Chopra ) या आदित्य चोप्रा याची आई आणि राणी मुखर्जीची (Rani Mukherji) सासू होत्या.वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. पामेला चोप्रा प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. तसेच लेखिका आणि निर्मातीही होत्या. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्या व्हेटिलेटरवर होत्या, मात्र त्यांच्या तब्बेतीत कोणतीही सुधारणा नव्हती. आज सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्येच त्यांना अखेरचा श्वास घेतला.
मल्टीपल ऑर्गन निकामी झाल्यामुळे पामेला यांचा मृत्यू
न्यूमोनिया, श्वासोच्छवासाचा त्रास आणि मल्टीपल ऑर्गन निकामी झाल्यामुळे पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाल्याचं समजतंय. पामेला यांनी 1970 मध्ये यश चोप्रासोबत लग्न केले होते. पामेला यश चोप्रा यांची दुसरी पत्नी होत्या. यशराज फिल्म्सनेही ट्विट करून पामेला चोप्राच्या मृत्यूबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.
pic.twitter.com/RbcwNJDbm7 — Yash Raj Films (@yrf) April 20, 2023
लेखिका-गायिका म्हणूनही पामेला यांची ओळख होती.
लेखिका-गायिका म्हणूनही पामेला यांची ओळख होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये गाणीही गायली, ज्यात कभी कभी, नूरी, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मुझे दोस्ती करोगी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यशराजच्या चित्रपटांमध्ये निर्माती म्हणूनही त्यांचे नाव अनेकवेळा सिल्व्हर स्क्रीनर तुम्ही पाहिले असेल. पामेला आणि यश यांना दोन मुलगे आहेत, आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा.
पामेला ‘द रोमॅंटिक्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये शेवटच्या दिसल्या होत्या
पामेला चोप्रा YRF डॉक्युमेंट्री ‘द रोमॅंटिक्स’ मध्ये शेवटच्या दिसल्या होत्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांनी पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. ‘द रोमॅंटिक्स’ने यश चोप्राच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानावरच लक्ष केंद्रित केले नाही तर पामेला यांच्या योगदानावरही लक्ष केंद्रित केले.शोमध्ये, पामेला यांनी आठवणींना उजाळा दिला होता. जेव्हा दिग्दर्शकाने निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट (दाग, 1973) रिलीज होण्यापूर्वी अनेक रात्री जागं राहून घालवल्या होत्या त्याचीही आठवण पामेला यांनी यामध्ये सांगितली होती.