phonebhoot
‘फोनभूत’ (PhoneBhoot) चित्रपटाचा पहिला लूक सादर केल्यानंतर एक्सेल एंटरटेनमेंटने आता चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर रिलीज (PhoneBhoot Motion Poster Release) केलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif), इशान खट्टर (Ishaan Khatter) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) चित्रपटाच्या इनसाइड वर्ल्डची झलक दाखवत आहेत.
कतरिना, ईशान आणि सिद्धांत हे मैत्रीपूर्ण त्रिकूट फोनभुतद्वारे सिनेप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. नुकतंच समोर आलेलं ‘फोनभूत’चं नवीन मोशन पोस्टर जरा वेगळंचं आहे. हे मोशन पोस्टर आपल्याला चित्रपटाच्या कथेबद्दल सांगते. नेहमीप्रमाणे यात कतरिना कैफ फ्रेश दिसत आहे. त्याशिवाय सिद्धांत आणि ईशानचा लूकही खूपच आकर्षक आहे.
[read_also content=”काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी करण्यात आलं ‘तुर कलेयां’ गाण्याचं शूटींग https://www.navarashtra.com/entertainment/from-kashmir-to-kanyakumari-tur-kalleyan-song-shooting-was-done-on-various-places-nrsr-304409/”]
फोनभूतची निर्मिती करणारी एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी ‘फोनभूत’चं नवीन मोशन पोस्टर रिलीज करून ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चा ११ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या आगामी साहसी कॉमेडीचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केलं आहे.