phonebhoot
कतरिना कैफ (Katrina Kaif), ईशान खट्टर (Ishan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) अभिनीत एक्सेल एंटरटेनमेंटच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. दर्शकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुक्ता शिगेला असतानाच, निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘किन्ना सोना’ चा (Kinna Sona Song Teaser) टीझर प्रदर्शित केला आहे.
[read_also content=”‘सायलेन्स- कॅन यू हिअर इट?’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर https://www.navarashtra.com/movies/world-television-premier-of-silence-can-you-hear-it-nrsr-335461.html”]
तनिष्क बागचीद्वारा लिखित आणि रचित हे गाणे, झाहरा व तनिष्क यांनी गायले आहे. राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात, कतरीनाला ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत पाहायला मिळेल. कतरीनाचा लग्नानंतर हा पहिला चित्रपट असून, आकर्षक गाणी आणि पडद्यावरचा अनोखा अवतार प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.
चित्रपटाचा ट्रेलर ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्या दिवशी यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. तर अवघ्या २४ तासांत या ट्रेलरने सुमारे ३० दशलक्ष व्ह्यूजचा आकडा ओलांडला असतानाच, या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे यात शंका नाही. गुरमीत सिंगद्वारा दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.