अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ती लवकरच पुष्पा 2 या चित्रपटात दिसणार आहे. तिचे फॅन्स फार आतुरतेने तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. नॅशनल क्रश असलेली रश्मिका सध्या मुंबईत आहे. नुकतचं तिने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं कौतुक केलं असून देशाच्या विकासाकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूचं (Atal Setu) कौतुक करताना ती म्हणाली की आम्ही आता दोन तासांचा प्रवास २० मिनिटांत पूर्ण करतो. आता तिच्या या पोस्टवर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे.
[read_also content=”हाताला फ्रॅक्चर असूनही ऐश्वर्याचा कान्स चित्रपट महोत्सवात जलवा, तिच्या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा! https://www.navarashtra.com/movies/aishwarya-rai-bachchan-look-for-cannes-red-carpet-goes-viral-nrps-534248.html”]
रश्मिकाच्या कौतुकाच्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या X अंकाऊटवर लिहिलं की, “नक्कीच! लोकांना जोडणे आणि जीवन चांगले बनवणे यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही नाही.”
Absolutely! Nothing more satisfying than connecting people and improving lives. https://t.co/GZ3gbLN2bb
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2024
रश्मिकाने तिच्या X हँडलवर ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने अभियांत्रिकी चमत्कार नवीन भारताचे दरवाजे कसे उघडतात हे स्पष्ट केले. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भारताच्या विकासाचे आणि भविष्याचे भरपूर कौतुक केले. तिच्या प्रेक्षकांना भारताच्या विकासासाठी मत देण्यास सांगितले.
पुढे ती म्हणाली की, “नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई आणि बेंगळुरू ते मुंबई प्रवास आता खूप सोपा झाला आहे. ही अद्भुत पायाभूत सुविधा पाहून अभिमान वाटतो.” आता भारताला विकासाच्या बाबतीत कोणीही रोखू शकत नाही. आता भारतात असे होऊ शकत नाही असे कोणी म्हणू शकत नाही. गेल्या 10 वर्षात भारतात खूप विकास झाला आहे.
South India to North India… West India to East India… Connecting people, connecting hearts! ? #MyIndia pic.twitter.com/nma43rN3hM
— Rashmika Mandanna (@iamRashmika) May 16, 2024
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदान्ना लवकरच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर होणार आहे. तर रश्मिका सिकंदर चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत आहेत.