फोटो सौजन्य - Social Media
बांदेकर कुटुंब सिने क्षेत्रात फार सक्रिय असतात. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर असो वा त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर! अगदी अनेक दशकांपासून दोघेही मराठी सिने क्षेत्रात नाव करून आहेत. दरम्यान, बांदेकर कुटूंबात नव्या पाहुण्याची कायमची एंट्री होणार आहे. बांदेकरांचा दिवा सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून होताना दिसत आहेत. अशामध्ये बांदेकरांनी स्वतः शेअर केलेली एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आदेश बांदेकरांनी त्यांच्या @aadesh_bandekar या सोशल मीडिया हॅण्डलवरून त्यांच्या घरातील गणपतीच्या आरतीचे काही ग्लिम्प्स शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री पूजा बिरारी दिसून आली आहे. त्यामुळे आदेश बांदेकरांची होणारी सून बाई पूजा बिरारी? असा सवाल आणि चर्चा दोन्ही सोशल मीडियावर रंगताना दिसून येत आहे. बांदेकर कुटुंबियांसोबत अभिनेत्री पूजा बिरारी दिसून आली आहे.
पोस्टखाली कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी चांगलीच चर्चा रंगवली आहे. एका नेटकऱ्याने “भावी सून बाई पण आहेत आरतीला, खूप छान” असे नमूद केले आहेत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “पूजा बिरारी आणि सोहमची न्यूज खरी आहे म्हणजे!” असे नमूद केले आहे. तर अनेक चाहत्यांनी गणपतीचा गजर केला आहे.
पूजा बिरारी छोट्या पडद्यावर काम करत असून ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर स्टार प्रवाहवरील मालिका ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम छोट्या पडद्यावर झळकला होता. सोहम ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटातही दिसून आला होता.