प्रतीकने हटवलं वडील राज बब्बर यांचं नाव; सावत्र भाऊ आर्य म्हणाला, “स्मिता मां आमची…”
अभिनेता प्रतीक बब्बरने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. मात्र या लग्नाला त्याने त्याचे वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नव्हतं. त्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रतीक आणि प्रियाने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी कुटुंबातील काही गोष्टींबद्दल मन मोकळेपणाने भाष्य केले होते. वडिलांचं नाव हटवण्यामागचं कारण अभिनेत्याने सांगितलं, त्यानंतर त्याचा सावत्र भाऊ आणि राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने प्रतिक्रिया दिली आहे.
२४ तासांत ‘सिकंदर’च्या हजारो तिकिटांची विक्री, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये झाली कोटींची कमाई
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आर्य बब्बर म्हणाला की, “मला फक्त इतकंच म्हणायचंय की, ‘स्मिता माँ’ आमचीही आई होती. त्याला (प्रतीकला) कोणतं नाव लावायचंय आणि कोणतं नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. उद्या मी माझं नाव आर्य बब्बरवरून आर्या करेन किंवा राजेश असं ठेवेन, तरीही मी बब्बरच राहणार आहे. तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, तुमचे अस्तित्व नाही. मी नेहमीच बब्बरच राहीन कारण माझे अस्तित्व तेच आहे, ते बदलता येणार नाही. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही स्वत:चं अस्तित्व कसं काय बदलू शकता ?”
दरम्यान, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक नाव हटवण्याबद्दल म्हणाला की, “मला निकालाची पर्वा नाही. हे नाव ऐकल्यावर मला कसं वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला पूर्णपणे माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारशाशी जोडलेलं राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही, तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय.”