Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टाईमपास’मधल्या दगडूचे फिल्म इंडस्ट्रीत बेधडक ११ वर्षे, प्रथमेश परबने शेअर केली स्पेशल पोस्ट

रवी जाधव यांच्या 'टाईमपास' चित्रपटातून सर्वाधिक प्रसिद्धी 'दगडू'ला म्हणजेच प्रथमेश परबला मिळाली. चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणाऱ्या दगडूला यावर्षी इंडस्ट्रीत ११ वर्षे झालीये. यानिमित्त प्रथमेशने पोस्ट शेअर केली

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 03, 2025 | 01:06 PM
'टाईमपास'मधल्या दगडूचे फिल्म इंडस्ट्रीत बेधडक ११ वर्षे, प्रथमेश परबने शेअर केली स्पेशल पोस्ट

'टाईमपास'मधल्या दगडूचे फिल्म इंडस्ट्रीत बेधडक ११ वर्षे, प्रथमेश परबने शेअर केली स्पेशल पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

३ जानेवारी २०१४ रोजी दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकवले. यातील संवाद, गाणी आणि स्टाईल पॉप्युलर झालीच, पण त्यासोबतच चित्रपटाचा नायक असलेला दगडूने रसिकांच्या मनात घर केले. या चित्रपटाने दगडूच्या रूपात मराठी सिनेसृष्टीला प्रथमेश परब नावाचा सुपरस्टार दिला. ‘अँड स्टार इज बॉर्न’ ही इंग्रजी भाषेतील म्हण ‘टाईमपास’ने दगडूच्या रूपात खरी करून दाखवली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ११ वर्षे झाली असली तरी त्यातील गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. या दरम्यान प्रथमेश मराठीतून हिंदीकडे झेपावला असून, तिथेही आपला अमीट ठसा उमटवण्यात यशस्वी होत आहे. नवीन वर्षात तो सिनेमांचा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सचिन पिळगांवर करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा

‘ए, तो बघ दगडू!’, ‘दगडू, एक सेल्फी काढू का?’, ‘दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?’ या प्रश्नांनी सुखावणाऱ्या दगडूला प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ११ वर्षे झाली आहेत. एक व्यक्तिरेखा कशा प्रकारे एखाद्या कलाकाराच्या करियरला कलाटणी देऊ शकते आणि त्याचे संपूर्ण जीवनच पालटून टाकू शकते, याचे उत्तम उदाहरण दगडू आहे. या व्यक्तिरेखेने प्रथमेशला असा काही यशाचा मार्ग दाखवला की, त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नवनवीन व्यक्तिरेखांची आव्हाने स्वीकारत तो वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहिला. याच कारणामुळे आज प्रथमेशच्या खिशात अतिशय महत्त्वाचे आगामी चित्रपट आहेत.

मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या ८ चित्रपटांची केली घोषणा, Bhediya 2 आणि Stree 3 केव्हा येणार ?

‘टाईमपास’ प्रदर्शित होऊन ११ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत प्रथमेश म्हणाला की, “‘ए, तो बघ दगडू!’, ‘दगडू, एक सेल्फी काढू का?’, ‘दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?’ आज ११ वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे, या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. माझं आयुष्य ३६० डिग्रीने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग! एखादा सिनेमा हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा सिनेमा फारसा चालला नाही तरीही! सिनेमा हिट झाल्यावर, ‘टाईमपास’च्या वेळचे ‘हाऊसफुल’चे फलक आठवतात. ‘आई, बाबा आणि साईबाबा शप्पथ’, असंच काम करत रहा, असं म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवतं. त्याउलट जर एखादा सिनेमा फारसा चालला नाही तर, तू टेन्शन नको घेऊस रे, टेन्शनला, ‘चल ए, हवा आने दे’ असं म्हण आणि पुढे जा, असंही म्हणणारा दगडू मला जाणवतो. मला खरी ओळख दिली ती या दगडूने… यासाठी रवीसर, मेघना मॅडम आणि प्रियदर्शन दादाचे खूप खूप आभार…”

 

मराठी चित्रपटांसोबत ‘दृश्यम’सारखा सुपरहिट हिंदी चित्रपट आणि ‘ताजा खबर’ ही रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या वेब सीरीजसह इतर बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकलेला प्रथमेश या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. प्रथमेशच्या आगामी चित्रपटांच्या यादीत तूर्तास ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘मुंबई लोकल’, ‘सुसाट’, ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘हुक्की’ या चित्रपटांचा समावेश आहे. याखेरीज इतर काही चित्रपटांची बोलणी सुरू असून, हिंदीतही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. काही आगामी प्रोजेक्टसच्या गोष्टी सध्या प्राथमिक पातळीवर सुरू असल्याने त्याबाबत जास्त काही सांगणे शक्य नसल्याचे प्रथमेश म्हणाला. थोडक्यात काय तर रसिकांना नवीन वर्षात प्रथमेशच्या चित्रपटांचा धमाका अनुभवायला मिळणार आहे.

Kumar Vishwas: सैफ-करिनाच्या मुलाचे नाव घेऊन का संतापले कुमार विश्वास? सोशल मीडियावर सुरु झाली चर्चा!

Web Title: Prathamesh parab completed film industry in 11 years actor shared on special post in instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.