‘फुले’ चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुलेंची कास्टिंग कशी झाली ? अभिनेत्याने सांगितलं सर्व काही...
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. २५ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रतीक गांधी आणि पत्रलेखा आहे. चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत अभिनेता प्रतीक गांधी असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अर्थातच सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पत्रलेखा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये, फुले यांच्या तरुण वयापासूनच चित्रपटाची सुरुवात झालेली आहे. या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची तरुण वयातील भूमिका नवखा कलाकार विशाल अर्जुन साकारणार आहे.
सध्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सर्वच कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशन दरम्यानच चित्रपटामध्ये फुलेंची तरुण वयामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विशाल अर्जुनने ‘नवराष्ट्र डिजीटल’सोबत संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या भूमिकेसह वैयक्तिक आयुष्यातीलही काही मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. विशालचा ‘फुले’ चित्रपट हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातूनच त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. त्याने मुलाखतीमध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीवर भाष्य केलंय. विशाल म्हणाला, “माझ्यामध्ये दहावीनंतरच अभिनय करण्याची आवड निर्माण झाली. सर्वात आधी मी एक थिएटर ग्रुप जॉईंट केला होता, त्यानंतर काही मराठी नाटक, एकांकिका आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आणि त्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांच्या ॲक्टिंग स्कुलमध्ये मी ॲक्टिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर इतक्या मोठ्या फिल्ममध्ये मला काम करण्याची संधी मिळालीये.”
प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी; “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
“इतक्या महान व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी फार खास गोष्ट होती. मी प्रमुख भूमिका करत असल्यामुळे चित्रपटात काम करण्यासाठीचा माझ्यासाठीचा आनंद फारच वेगळा होता. मोठ्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत आणि कलाकारांसोबत काम करताना मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाले. मी अनंत महादेवन यांच्यासोबत काम करणाऱ्या सहाय्यक दिग्दर्शक नंदू आचरेकर यांच्याकडे एका कार्यक्रमाच्या वेळी मी माझं पोर्टफोलियो दिलेलं. नंदू सरांना माझं पोर्टफोलियो दिल्यानंतर काही दिवसांतच मला अनंत सरांनी मला ‘फुले’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करायला संधी मिळतेय, या गोष्टीवर मला विश्वासच बसत नव्हता. मला जेव्हा त्यांनी फायनल मिटिंगला बोलवलं होतं. त्यावेळी दिग्दर्शकांनी मला डायरेक्ट चित्रपटाच्या शुटिंगच्या डेटच दिल्या. चित्रपटाची शुटिंग एप्रिल २०२३ मध्ये झाली होती.”
“मला बॉलिवूडमध्ये आणण्याचं श्रेय, मी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे सहदिग्दर्शक नंदू आचरेकर आणि राहुल सुर्यवंशी यांना देईल. त्यांच्यामुळेच मी आजवर इथपर्यंत आलोय. खरंतर, नंदू सरांना आणि राहुल सरांना मी २०२२ मध्ये झालेल्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये भेटलो होतो. त्यांनी माझं पोर्टफोलियो घेऊन ठेवलं होतं. जेव्हा ‘फुले’ चित्रपटाचं कास्टिंग सुरु होतं, त्यावेळी त्यांना माझं नाव दिग्दर्शकांना सजेस्ट केलं होतं. काही दिवसांतच मला चित्रपटाचं कन्फर्मेशन मिळालं होतं. माझ्यासाठी हा चित्रपट खरंच खूप स्पेशल आहे.”