"२.३० मिनिट टाळ्या अन् standing ovation"; ‘सिंघम अगेन’ पाहून पृथ्वीक प्रताप भारावला, लेखकाचं केले तोंडभरून कौतुक
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षक दमदार प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाने अकरा दिवसांत ३०० कोटींचा गल्ला जमावला आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सामान्य माणसांपासून ते इंडस्ट्रीतील कलाकारांपर्यंत सर्वच लोकं चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक केले आहे. लेखक क्षितीज पटवर्धनचे कौतुक करणारी पोस्ट पृथ्वीक प्रतापने शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये पृथ्वीक प्रताप म्हणतो,
“काल सिंघम सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बॉलिवूडने तयार केलेला mass entertainment cinema एन्जॉय केला. लेखकांसाठी साधारण २-२.३० मिनिट वाजलेल्या टाळ्या आणि standing ovation, प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे सांगत होत्या. लहानपणी सगळ्यांनीच दूरदर्शनवर रामायण पाहिलयं, अनेक वर्षे ते आपण वाचत आलोय, ऐकत आलोय, पाहत आलोय. त्यामुळे या महाकाव्याची संपूर्ण गोष्ट सगळ्यांना तोंडपाठ असणं स्वाभाविकच आहे. आणि याच पवित्र महाकाव्या भोवती सिंघम सिनेमा बागडत राहतो. सिनेमात फक्त ॲक्शन नाही तर कलियुगात सुद्धा श्री रामांची तत्व जपणारा एक नायक आहे जो आपल्याला ही श्री रामांचा मार्ग पत्करायला प्रवृत्त करत असतो. फक्त डायलॉगबाजी नाही तर नितिमत्तेचे संदेश आहेत. फक्त रंजन नाही तर एक दिशा आहे, आयुष्य जगण्याची आणि हे सगळं कथेत, कथेभोवती गुंफण्याचं काम क्षितीज पटवर्धन याने केलेलं आहे. सिनेमा इतक्या कमालीच्या वेगाने स्क्रीनवर आणि मनावर पकड घेतो की आपल्याला दाद द्यायला ही उसंत मिळत नाही. सिनेमाचा शेवट काय होणार आहे आपल्याला माहिती असतं पण तरीही तो पाहण्याची उत्सुकता कमी होतं नाही आणि इथेच हा सिनेमा मनं जिंकतो. धोनी सिनेमाच्या शेवटी MSD वर्ल्डकप विनिंग सिक्सर मारणार हे माहित असूनही उत्कंठा वाढते की नाही? अगदी तसंच सिंघम बाबतही होतं. त्यामुळे ज्यांना सिनेमे एन्जॅाय करायला आवडतात त्यांनी हा सिनेमा OTT वर येण्याची वाट पाहू नका. सरळ तिकीटं बुक करा आणि सिनेमागृहात पाहा. ही पोस्ट लिहिण्याचं कारणं ह्या सिनेमाची कथा माझ्या one of the favourite writers क्षितीज पटवर्धन याने लिहीली आहे. ‘Cinema is a director’s medium’ हे जरी खरं असलं तरी ‘Cinema is writers message to society and a firm opinion of him’ हे अमान्य करून चालणार नाही. आणि हो चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान ‘मराठी माणूस’ हवाचं.”