Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माधुरी दीक्षित यांनी निर्मित चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित, ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

या गाण्याच्या संदर्भात गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले की, ‘’हे गाणे पडद्यावर पाहाणे जितके धमाल दिसतेय. तितकेच ते चित्रीत करणे खरंच आव्हानात्मक होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2023 | 03:20 PM
माधुरी दीक्षित यांनी निर्मित चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित, ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

पंचक चित्रपटाचे टायटल साँग : अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांनी निर्मित केलेला पंचक हा चित्रपटाच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पंचक या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळीवेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले असून गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले आहे. गाण्यामधील स्वर हे ऐकण्यासाठी श्रवणीय आहेत त्याचबरोबर ते गाणे पाहायलाही कमाल आणि मजेदार आहेत.

जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत .

या गाण्याच्या संदर्भात गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले की, ‘’हे गाणे पडद्यावर पाहाणे जितके धमाल दिसतेय. तितकेच ते चित्रीत करणे खरंच आव्हानात्मक होते. चार कलाकार धावत आहेत आणि त्यांच्या मागे पाचवा कुत्रा धावत आहे. किती तरी वेळ कलाकारांच्या आणि कुत्र्याच्या धावण्यात मेळ साधला जात नव्हता. या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस चालले. दोन दिवस हे कलाकार संपूर्ण गावभर पळत राहिले. हा सीन नैसर्गिक वाटावा, म्हणून ही सारी मेहनत होती. असे चित्रपट पडद्यावर पाहायला गंमतीदार दिसत असले तरी यामागे मेहनत खूप जास्त असते.’’

संगीतकार मंगेश धाकडे म्हणतात, ‘’ हे एक धमाल गाणे आहे. याचे काही भाग आधीच चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटाचे जे वैशिष्ट्य आहे, ते गाण्यातूनही व्यक्त व्हावे, असे अपेक्षित होते. चित्रपटाच्या कथेची मजा गाण्यातही आणायची होती. आणि या गाण्यात या ओळी चपखल बसवण्यात आल्या. हे शब्द या परिस्थितीशी तंतोतंत जुळले आणि गाण्यात अधिकच रंगत आणली.’’

 

Web Title: Produced by madhuri dixit the title song of the film released panchak is all set to entertain the audience madhuri dixit nene and dr shri ram nene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 03:20 PM

Topics:  

  • Dr. Shri Ram Nene

संबंधित बातम्या

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स
1

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.