
अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएलने (R’Bonney Gabriel) 71 वा मिस युनिव्हर्सचा (Miss Universe 2022) किताब पटकावला आहे. भारताच्या माजी मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने (Harnaaz Sandhu) गॅब्रिएलला मुकुट घातला. मिस युनिव्हर्सची ही स्पर्धा अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात पार पडली. व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल न्यूमन ही या स्पर्धेतील पहिली उपविजेती तर डॉमिनिकन रिपब्लिकची अँड्रिया मार्टिनेझ ही दुसरी उपविजेती ठरली. मिस युनिव्हर्स बनलेली आर बोनी गॅब्रिएल या अमेरिकेतील टेक्सासमधील ह्यूस्टन येथील रहिवासी असून व्यवसायाने फॅशन डिझायनर आहेत.
[read_also content=”अखरे राखी सावंतच्या लग्नाचा ड्रामा संपला, आदिलने लग्न झाल्याच केलं मान्य! https://www.navarashtra.com/movies/rakhi-sawant-marriage-controversy-adil-khan-durrani-finally-accepts-nikah-nrps-362100.html”]
मिस युनिव्हर्सचा हा भव्य कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान मिस यूएसए आर बोनी गॅब्रिएलने आपल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आणि या उत्तरामुळे तिला मिस युनिव्हर्स 2022 चा खिताब मिळाला.
जर तुम्ही मिस युनिव्हर्स बनलात तर ही एक मजबूत आणि प्रगतीशील संस्था आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही कसे काम कराल?
याला उत्तर देताना गॅब्रिएल म्हणाली, मला एक नेतृत्व म्हणून फॅशन इंडस्ट्रीचा कायापालट करायला आवडेल. फॅशन डिझायनिंगमध्ये 13 वर्षे काम केल्यानंतर, मला फॅशनचा चांगल्यासाठी वापर करायला आवडेल. मी फॅशनचे साधन म्हणून पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याचा वापर करतो आणि प्रदूषण कमी करण्यासाठी माझा पाठिंबा देतो. मी माझे कपडे स्वतः बनवतो. मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मी शिवणकाम शिकवते आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करते. आपण इतरांवर गुंतवणूक केली पाहिजे. तुम्हाला तुमच्या समाजात गुंतवणूक करावी लागेल. आपल्या अद्वितीय प्रतिभेने आपल्याला समाजात बदल घडवायचा आहे. आपल्या सर्वांमध्ये काहीतरी खास आहे. जर आपण आपल्या प्रतिभेची बीजं रुजवली आणि इतरांवर त्याचा प्रभाव टाकला तर आपण त्याला सकारात्मक बदलासाठी एक साधन बनवू शकतो.
भारताच्या माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने आर बोनी गॅब्रिएलचा मुकुट परिधान केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुकुटाची किंमत 46 कोटी रुपये आहे. या मुकुटात हिरे आणि नीलम जडले आहेत. याशिवाय या मुकुटात एक मोठा नीलमही आहे आणि त्याच्या सभोवताली हिरे जडले आहेत. या संपूर्ण मुकुटात एकूण ९९३ दगड आहेत. ज्यामध्ये 110.83 कॅरेटचा नीलम आणि 48.24 कॅरेटचा पांढरा डायमंड आहे. मुकुटाच्या शीर्षस्थानी असलेल्या शाही निळ्या नीलम्याचे वजन 45.14 कॅरेट आहे.