Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”

राधिका आपटे 'साली मोहब्बत' सिनेमाच्या माध्यमातून अगदी पहिल्यांदाच मनीष मल्होत्रासह काम करत आहे. तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 18, 2025 | 05:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘साली मोहब्बत’ प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे
  • ‘साली मोहब्बत’ वेगळेपण जपणारा सिनेमा ठरत आहे
  • अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे
Zee 5 या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘साली मोहब्बत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. स्लो-बर्निंग सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील हा सिनेमा सध्या ZEE 5 वरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. भावनिक खोली, गुंतागुंतीची कथा आणि प्रभावी अभिनय यामुळे ‘साली मोहब्बत’ प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘काही फरक पडत नाही..’ ‘धुरंधर’ चित्रपटामुळे होणाऱ्या कौतुकावर पहिल्यांदाच बोलला अक्षय खन्ना; आश्चर्यकारक उत्तर

प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा पहिलाच चित्रपट असून, या प्रोजेक्टला प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि निर्माता मनीष मल्होत्रा यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. त्यांच्या निर्मितीमुळे या सिनेमाला एक वेगळीच उंची मिळाल्याचे चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे. कथा, सादरीकरण आणि मांडणी या सर्वच बाबतीत ‘साली मोहब्बत’ वेगळेपण जपणारा सिनेमा ठरत आहे.

या चित्रपटात राधिका आपटे आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका असून, दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. नातेसंबंध, विश्वासघात, नैतिक गुंतागुंत आणि योग्य-चुकीच्या सीमारेषेतील सूक्ष्म फरक यांचा शोध घेणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवतेवर आणि भावनिक संयमावर आधारलेला हा सिनेमा एक ताकदवान सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून समोर येतो.

या प्रोजेक्टबद्दल बोलताना अभिनेत्री राधिका आपटे यांनी मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, “मनीष मल्होत्रा यांच्यासारखं मोठं नाव जेव्हा एखाद्या प्रोजेक्टसाठी विचारतं, तेव्हा तो क्षण खूप खास असतो. खरं सांगायचं तर, त्यांनी मला या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मला वाटलं की ते मला कास्ट करणार आहेत आणि मी खूप भारावून गेले होते. याआधी आम्ही कधीच एकत्र काम केलं नव्हतं आणि आम्ही एकाच वर्तुळातही वावरत नव्हतो.”

राधिका पुढे म्हणाल्या, “एकदा आम्ही डिनरसाठी भेटलो आणि आमचं लगेच छान जुळून आलं. इंडस्ट्रीमध्ये फारच मोजक्या लोकांबद्दल मी असं म्हणू शकते, पण मनीषबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, कलाकारांवर असलेला विश्वास आणि सर्जनशील दृष्टी खरोखरच प्रेरणादायी आहे. म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासारखे लोक फारच कमी असतात.”

‘त्याचे कृत्य पाहून मला धक्का बसला…’, ‘बिग बॉस १९’ फेम मालती चहरने कास्टिंग काउचबद्दल केला धक्कादायक खुलासा

ही परस्पर विश्वासाची भावना आणि सर्जनशील जुळवणी ‘साली मोहब्बत’मध्ये स्पष्टपणे दिसून येते. दिव्येंदूने साकारलेली व्यक्तिरेखा अतिशय संयमित आणि प्रभावी ठरते, तर राधिकाने तिच्या भूमिकेला दिलेली भावनिक खोली चित्रपटाला अधिक मजबूत बनवते. एकूणच, ‘साली मोहब्बत’ची कथा, पात्रांची गुंतागुंत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट एक वेगळा आणि लक्षात राहणारा अनुभव देतो. स्लो-बर्निंग थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा ठरत आहे.

Web Title: Radhika aapte shared her exprience about first time work with manisha malhotra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 05:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.