परिणितीबाबत नवरा राघवचा मोठा खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा नुकतेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसले. त्यांनी शोमध्ये एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आणि मजेदार गोष्टी सांगितल्या. राघवने परिणीतीबद्दल असे काही सांगितले की ते ऐकून अर्चना पूरन सिंग आणि कपिल शर्मादेखील आश्चर्यचकित झाले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसले. निर्मात्यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या या भागाचा प्रोमो रिलीज केला आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा प्रोमो सुरू होताच, कपिल राघव चड्ढाला चिडवताना दिसतो. तो त्याला पहिल्या भेटीपासून ते प्रपोजलपर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल विचारत आहे आणि हा एपिसोड कमाल असणार आहे असे या शो च्या चाहत्यांना वाटत आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अनवाणी पोहचला राघव
नुकताच नेटफ्लिक्सवर या शो चा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे आणि यामध्ये राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोमध्ये अनवाणी आला. त्याला असे पाहून कपिलने विचारले, ‘तुम्ही अशी इच्छा केली होती का की जर मी परीशी लग्न केले तर मी कपिलच्या शोमध्ये अनवाणी जाईन.’ मग राघव चड्ढा म्हणतो, ‘मी स्टेजच्या मागे बसलो होतो आणि कोणीतरी माझे बूट चोरले.’ मग कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा प्रवेश करतात, जे राघव चड्ढाकडे बूट चोरल्याबद्दल शगुन मागण्यासाठी जातात. यावर राघव म्हणतो, ‘तुम्हाला नेत्याच्या खिशातून पैसे काढायचे आहेत का?’ हे ऐकून सगळे हसतात. लहानशा प्रोमोत ही दिसलेली मजा पूर्ण एपिसोडमध्ये अजून धमाल असेल हे नक्की.
परिणितीबाबत धक्कादायक खुलासा
त्यानंतर कपिलने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना लग्नानंतर करण्यात येणारा पाण्यात अंगठी शोधण्याचा विधी करायला लावला. तर कपिलने त्यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दलदेखील विचारले. त्यानंतर राघव चड्ढा परिणीती चोप्राबद्दल एक खुलासा करतो. तो सांगतो की परिणीती जे काही बोलते ते उलट असते. राघव म्हणतो, ‘आम्ही पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो होतो. त्या भेटीनंतर तिने तिचा लॅपटॉप उघडला आणि तिने पहिले काम राघव चड्ढाची उंची तपासली.’
कपिलच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तरं
कपिल शर्माने विचारले, ‘निवडणूक जिंकणे की पत्नीचे मन जिंकणे जास्त कठीण?’ तर राघव म्हणाला, ‘पाच वर्षांनी एकदा निवडणूक जिंकावी लागते. दर तासाला पत्नीचे मन जिंकावे लागते.’ यानंतर, नवजोत सिंग सिद्धू यांनी राजकारण ही सह-पत्नी आहे असे सांगताच परिणीती म्हणाली- तुम्ही मला हे आधी का सांगितले नाही? हे सर्व गुगलमध्ये दिसले नाही. मग राघव नवजोत सिद्धूला म्हणाला- तुम्हीही आगीत अजून तेल ओतत आहात.
रोज सकाळी परिणितीकडून ‘हे’ वदवून घेतो राघव
या व्हिडिओत राघव चड्ढा म्हणाला, ‘ती काहीही म्हणते तरी उलट घडते. ती म्हणाली की ती आयुष्यात कधीही राजकारण्याशी लग्न करणार नाही. तिने एका राजकारण्याशी लग्न केले. आता मी तिला रोज सकाळी उठवतो आणि तिला सांगतो की राघव चड्ढा कधीही भारताचा पंतप्रधान होणार नाही असं म्हण’ हे ऐकून अर्चना, नवज्योत सिंग सिद्धू आणि कपिल शर्मा मोठ्याने हसतात.
‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
पहा व्हिडिओ