
बॉलिवूड अभिनेता (Reteish Deshmukh) आणि अभिनेत्री (Genelia Deshmkh) यांचा पहिला मराठी सिनेमा वेड (Ved Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पंसतीस उतरेल्या या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरक्ष वेड लावलं होत. काही दिवसापुर्वी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता हा सिनेमा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. स्टार प्रवाहवर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे.
[read_also content=”वेगाने पसरतोय eye flu! काय आहेत त्याची लक्षणे आणि त्याच्यावरी उपाय, जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/eye-flu-is-spreading-fastly-in-country-know-its-symptoms-nrps-437117.html”]
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या वेड सिनेमाने बॅाक्सऑफिसवर 75 कोटींचा गल्ला जमवला होता. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. या सिनेमाला महाराष्ट्र्भरातील प्रेक्षकांची पंसती मिळाली. आता हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहायलची संधी प्रेक्षकांना मिळणार असून येत्या 20 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहवर तुम्ही वेड सिनेमा पाहू शकता.
‘वेड’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Ved Box Office Collection) 2.25 कोटींची कमाई केली होती. सुरुवातीलाच दणदणीत कमाई करणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा गल्ला जमवला. ‘वेड’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक होते. ‘वेड’ हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. ‘वेड’ या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलियाने मराठी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.