फोटो सौजन्य - MX Player
‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील सर्वात मोठा आणि हिट रिअॅलिटी शो मानला जातो. लोकांना त्याचे वेड लागले होते. शो बंद पडल्यावर लोक निराश व्हायचे. प्रेक्षकांचे प्रेम पाहून निर्मात्यांना सीझन वाढवावा लागला. पण आता काळानुसार या शोचे आकर्षण कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत, अश्नीर ग्रोव्हरचा नवीन रिअॅलिटी शो ‘राईज अँड फॉल’ त्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे आणि गेमप्लेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. सोशल मीडियावर या शोची तुलना ‘बिग बॉस’शी केली जात आहे.
प्रेक्षकांच्या एका मोठ्या वर्गाचा असा विश्वास आहे की ‘राईज अँड फॉल’ हा कंटेंट आणि स्पर्धकांच्या बाबतीत ‘बिग बॉस’पेक्षा खूपच चांगला आहे. सध्या सलमान खान बिग बॉस १९ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे, तर अश्नीर ग्रोव्हर राईज अँड फॉल या शोमुळे चर्चेत आहे. हे दोन्ही शो वादग्रस्त शो आहेत, अशाप्रकारचे शो हे युवा पिढी मोठ्या प्रमाणात पाहते. राईस ऍन्ड फॉल या शोमध्ये पहिल्याच आठवड्यात धुमाकूळ पाहायला मिळाला.
शोमध्ये स्पर्धकांमध्ये फक्त भांडणेच नाही तर मारामारी देखील पाहायला मिळेल. या शोबद्दल सांगायची झाले तर यामध्ये एक पेंट हाउस आहे तर एक बेसमेंट बनवण्यात आले आहे. मोठी बिल्डिंग ज्यामध्ये हे दोन भाग असणार आहेत काही सदस्य हे पेंटहाउसमध्ये लक्झरी सुविधा अनुभवणार आहेत तर काहींना बेसमेंटमध्ये कामगारासारखे राहावे लागणार आहे. पहिला आठवडा पार पडला यामध्ये अनेक तास त्याचबरोबर अनेक भांडणे वाद पाहायला मिळाले.
वीकेडच्या वेळी अशनीर ग्रोवर हा सदस्यांची शाळा घेताना दिसला आहे. अरबाज पटेल आणि आरुष भोला यांच्यामध्ये झालेल्या मारामारीच्या प्रकरणावर अशनीर ग्रोवर स्पर्धकांना प्रश्न विचारणार आहे त्याचबरोबर अरबाज पटेल याला तो धमकावताना देखील दिसला. विकेंडला अशनीर ग्रोवर आला यामध्ये कालच्या भागामध्ये त्याने अरबाज पटेल याला त्याने केलेल्या कृत्यावर धमकावताना दिसला. मागिल आठवड्यामध्ये झालेल्या एका टास्कमध्ये अरबाज पटेल याला बेसमेंटला काही वेळासाठी पाठवण्यात आले होते.
यावेळी त्याने आरूषचा गळा धरला होता आणि या दोघांमध्ये मारामारी झाली होती यावेळी बेसमेंटला असलेल्या सदस्यांनी त्यांना थांबवले. यावरुन अशनीर ग्रोवरने सगळ्या सदस्यांसमोर अरबाज पटेल याला धमकावले आणि आणि म्हणाला की जर तू पुन्हा असे केल्यास मी तुला कधीही घरामध्ये येऊन बाहेर काढेल.
rulers par jab fall hone ki ghanti baji toh tower mein hogya hungama! #RiseAndFall, co-powered by @Lux_Innerwear
Official Lighting Partner: @orient_electric
AI Home Partner: @indiahaier
Official Health Partner: @pintolaofficial
Nutrition Partner: #AvvatarIndia pic.twitter.com/aGgFuFxHHK— Amazon MX Player (@MXPlayer) September 10, 2025