ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली (s s rajamaouli) दिग्दर्शित आणि राम चरण-ज्युनियर एनटीआर अभिनीत ‘RRR’ चित्रपटाने पुन्हा भारताचा झेंडा उंचावला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, चित्रपटाने आता 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये देखील दोन पुरस्कार मिळवले आहेत. गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा समीक्षकांचा चॉईस पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय चित्रपटाला त्याच्या ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी’ समीक्षकांचा चॉईस पुरस्कारही मिळाला.
[read_also content=”पोखरा विमानतळ चर्चेत, चीनने बांधलंय विमानतळ, मार्च २०१६ मध्ये दोन्ही देशांमध्ये झाला होता करार https://www.navarashtra.com/world/china-has-built-pokhara-airport-an-agreement-was-signed-between-the-two-countries-in-march-2016-nrps-361985.html”]
क्रिटिक्स चॉईस अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘RRR’ चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाला. ‘RRR’ चित्रपटासोबत ‘ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट’, ‘अर्जेंटिना 1985’, ‘बार्डो’, ‘फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ऑफ ट्रुथ्स’, ‘क्लोज’ आणि ‘डिसिजन टू लीव्ह’ या चित्रपटही स्पर्धते होते. पण या सर्व चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड पटकावला आहे.
Congratulations to the cast and crew of @RRRMovie – winners of the #criticschoice Award for Best Foreign Language Film.#CriticsChoiceAwards pic.twitter.com/axWpzUHHDx
— Critics Choice Awards (@CriticsChoice) January 16, 2023
या वर्षी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स भारतासाठी ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या ‘नाटू नाटू’ गाण्यात धमाकेदार डान्स केला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम यांच्या दमदार भूमिका केल्या.