फोटो सौजन्य - Social Media
गायक संजू राठोडने मराठी संगीताला साता समुद्रापार नेले आहे. मराठीचा डंका अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम संजूने त्याच्या गाण्यातून केले आहे. मोठमोठ्या हिंदी भाषी कार्यक्रमांमध्ये संजूचे मराठी गाणे अतिशय जोषात वाजले जात आहेत. महत्वाचे म्हणजे या मराठी गाण्यांवर संपूर्ण जग थिरकत आहे. गुलाबी साडी असो वा ‘शेकी शेकी’ दोन्ही गाण्यांनी इंस्टाग्राम हलवून सोडले आहे. आता यात अजून एका नव्या गाण्याची भर पडली आहे. नुकतेच संजूचे नवे गाणे ‘पिल्लू’ प्रदर्शित झाले आहे. दिवसभरात या गाण्याने चांगलेच व्युव्हज मिळवले आहेत.
जीएमई म्युझिक या लेबलखाली हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण या गाण्याचे निर्माते असून अभिजीत दाणी यांनी दिग्दर्शन केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे गाण्यात दाखवण्यात आलेली गोष्ट! या गाण्यातील सूर अगदी मनाला मोहणारे आहे. संजूचे हे गाणेदेखील सोशल मीडियावर ट्रेंड करेल का? असा काही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाच आहे. येत्या काही दिवसात हा ‘स्टार बॉय संजू’ आणि त्याच्या नवीन गाण्याची धुमाकूळ सोशल मीडियावर दिसून येईल अशी आशा संगीतप्रेमींनी वर्तवली आहे.
G-Spark या गाण्याचा संगीत दिग्दर्शक असून गाण्यात संजू राठोड आणि सेजल नायकरे मुख्य कास्टमध्ये दिसून आले आहेत. तसेच गाण्यामध्ये फिमेल वोकल्स मयुरी हरिमकरचे आहेत. संजू राठोडने या गाण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, ” प्रेक्षकांनो! जसे तुम्ही माझ्या गुलाबी साडी आणि shaky shaky या गाण्याला प्रेम दिलंत तसंच काही प्रेम माझ्या नव्या गाण्याला ‘पिल्लू’ यालाही द्या.” तसेच संजूने प्रेक्षकांना त्यांची प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
संजूचे गाणे सोशल मीडियावर आता कशी धुमाकूळ करेल? आणि किती धुमाकूळ करेल? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. इंस्टाग्रामवर या गाण्याची एण्ट्री झालीच आहे आता गाण्याच्या पुढील वाटचालीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.