Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची तब्येत खालावली, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

गेल्या काही दिवसांपासून घशाच्या त्रासामुळे विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देत आहेत. आता त्यांची प्रकृती खालावली आहे.

  • By साधना
Updated On: Nov 23, 2022 | 04:04 PM
Vikram-Gokhale

Vikram-Gokhale

Follow Us
Follow Us:

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती खालावली आहे.

विक्रम गोखले यांनी आजवर रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर दमदार भूमिका केल्या आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटातही विक्रम गोखले यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.

[read_also content=”‘रौंदळ’ चित्रपटातील रोमँटीक गाणं ‘मन बहरलं’ प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/photos/man-baharala-song-from-raundal-movie-is-released-nrsr-347639.html”]

अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे.  विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.

गेल्या काही दिवसांपासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देत आहेत.

Web Title: Senior actor vikram gokhales condition critical nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2022 | 03:59 PM

Topics:  

  • Vikram Gokhale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.