Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर शाहरुख खानला कसा वाटला? म्हणाला- “चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक…”

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने 'बेबी जॉन'चा ट्रेलर पाहिलाय. ट्रेलर पाहिल्यानंतर किंग खानने सोशल मीडियावर एक्स पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 10, 2024 | 04:37 PM
वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा ट्रेलर शाहरुख खानला कसा वाटला? म्हणाला- "चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक..."

वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा ट्रेलर शाहरुख खानला कसा वाटला? म्हणाला- "चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक..."

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणून धरलेली आहे, तशीच उत्सुकता इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांचीही ट्रेलरने उत्सुकता ताणलीये. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने ‘बेबी जॉन’चा ट्रेलर पाहिलाय. ट्रेलर पाहिल्यानंतर किंग खानने सोशल मीडियावर एक्स पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे.

जबरदस्त ॲक्शन अन् बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी; Baby John च्या ३ मिनिट ६ सेकंदाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

‘बेबी जॉन’च्या ट्रेलरबद्दल शाहरूख खानने लिहिलेय की, “किती छान ट्रेलर आहे. सर्वच कलाकारांनी चित्रपटात खूप छान काम केलंय. ट्रेलर पाहिल्यापासून मी चित्रपट पाहण्यासाठी खूपच आतुर आहे. कलिस तुझा ‘बेबी जॉन’ चित्रपट संपूर्ण तुझ्यासारखाच उर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असणार यात शंका नाही. ॲटली आता निर्माता म्हणून तुझा विजय होवो, तू यशस्वी होशील अशी आशा… तुझ्यावर खूप खूप प्रेम… वरूण धवन तुला या अंदाजात पाहून मला खूप आनंद झाला. खूप जबरदस्त दिसतोय जग्गु दा… किर्ती सुरेश, वामिका गब्बीसह संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा… हा चित्रपट म्हणजे एन्टरटेन्मेंटचं संपूर्ण पॅकेज आहे.”

 

What an exciting trailer. Well done really looking forward to seeing the film….@kalees_dir your #BabyJohn is everything like u. Energetic and full of action. @Atlee_dir go forth and conquer now as a producer. Love u. @Varun_dvn I am so happy to see u like this, all tough.…

— Shah Rukh Khan (@iamsrk) December 9, 2024

‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरनंतर आता ट्रेलरनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला बाप लेकीच्या सीन्सने सुरूवात होते. वरुण धवन चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. केव्हा पोलिस अधिकाऱ्याच्या, केव्हा एका वडीलाच्या, तर केव्हा एका प्रेमी युगलाच्या… तर वरुण धवनच्या विरोधात आपल्याला जॅकी श्रॉफ एका खलनायकाच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ३ मिनिट ६ सेकंदाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणून धरली आहे. प्रेम, त्याग आणि अन्यायाविरोधात लढा देणारा वरुण धवन चित्रपटात धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांना पहिल्यांदाच दिसणार आहे.

अभिनेता संजय दत्तनंतर या अभिनेत्रीची झाली एन्ट्री, टायगरसह दिसणार रोमँटिक अंदाजात!

धाडसी पोलिस अधिकारी म्हणून अभिनेता बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देताना पाहायला मिळणार आहे. तो त्याच्या मुलीच्या रक्षणासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, हे प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. वरुण धवन आणि जॅकी श्रॉफ यांच्यात कशा प्रकारे ॲक्शन होते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. ट्रेलरच्या शेवटी सलमान खानची झलक पाहायला मिळेल. त्याचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत नाही, अभिनेत्याचा झाकलेला चेहरा असून सलमान आणि वरुण दोघंही गुंडांशी मारामारी करताना दिसत आहेत. ट्रेलरच्या शेवटी त्याच्या आवाजात ‘मेरी ख्रिसमस’ ऐकू येतंय. ॲक्शन सीन्सने, काही भावनिक सीन्सने शिवाय बॅकग्राऊंड म्युझिकनेही प्रेक्षकांच्या मनावर ठाव घेतला आहे.

सरकारराज तसं ‘प्राजक्तराज…’, प्राजक्ता माळीने सांगितलेला किस्सा; राज ठाकरे म्हणाले , ‘मी राजभवन तरी घेतलं …’

ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमानचे संगीताने आणि त्यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकने (BGM)ट्रेलरला आणखी एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जात आहे. ज्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास अधिक उत्सुक आहेत. वरुण धवनची धमाकेदार एंट्री आणि वामिका गब्बीसोबतच्या त्याच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ससह यापूर्वी रिलीज झालेल्या चार्ट-बस्टर गाण्यातील ‘नैन मटक्का’ हे देखील ट्रेलर लॉन्च इव्हेंटचे मुख्य आकर्षण होतं. ‘बेबी जॉन’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव आहेत. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे निर्मित, ‘बेबी जॉन’ हा एक मोठा सिनेमॅटिक अनुभव आहे जो तुम्ही चुकवू शकत नाही. कॅलिस दिग्दर्शित हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shah rukh khan praised varun dhawan for baby john after watching trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • Bollywood Film

संबंधित बातम्या

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
1

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
2

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
3

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब
4

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.