Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुखच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई, ओपनिंग डेला 75 कोटींचा पल्ला गाठला.. ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडला

शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कलेक्शन करून इतिहास रचला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या कमाईसह अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Sep 08, 2023 | 10:28 AM
शाहरुखच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई, ओपनिंग डेला 75 कोटींचा पल्ला गाठला.. ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडला
Follow Us
Close
Follow Us:

Jawan Box Office: शाहरुख खानचा (Shahrukh khan) 2023 चा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘जवान’रिलीज (Jawan release) झाला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box office) धमाल केलेली आहे. ‘जवान’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाचा विक्रमही (opening day collection) या चित्रपटाने केला आहे. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत ‘पठाण’, ‘गदर 2’सह अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

‘जवान’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

शाहरुख खानच्या ‘जवान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई करून इतिहास रचला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘पठाण’चा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडला आहे. यासोबतच ‘जवान’ बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवसापासूनच कहर करणाऱ्या ‘जवान’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर सिनेमाने धमाकेदार ओपनिंग केले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये 63 ते 65 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. पठाण सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला आहे.

‘जवान’ने मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड

शाहरुख खानने आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘पठाण’ सिनेमाला मागे टाकले आहे. पठाणने पहिल्या दिवशी हिंदीमध्ये 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. जवानने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी भारतात सुमारे 63 – 65 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन चेन थिएटरमध्ये जवान सिनेमाने 31 कोटींची कमाई केली आहे, तर पठाणने या तीन चेन थिएटरमध्ये 27 कोटी कमावले होते. ‘जवान’ने हिंदी व्हर्जनमध्ये ‘पठाण’ पेक्षा 8 कोटींहून अधिक रुपयांची चांगली आघाडी घेतली आहे. ‘पठाण’ बुधवारी म्हणजेच कोणतीही सुट्टी नसताना तर ‘जवान’ जन्माष्टमीला रिलीज झाला आहे.

‘जवान’ स्टार कास्ट

एटली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खानशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचाही सिनेमात कॅमिओ आहे.

 

Web Title: Shahrukh khan nayanthara starrer jawan box office collection day one 75 crore net in india record break opening nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 10:28 AM

Topics:  

  • shahrukh khan

संबंधित बातम्या

2026 दीपिकासाठी खास ठरणार? दीपिका पादुकोण किंग आणि ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये झळकणार; आगामी चित्रपटाची प्रचंड उत्सुकता
1

2026 दीपिकासाठी खास ठरणार? दीपिका पादुकोण किंग आणि ‘या’ प्रोजेक्ट्समध्ये झळकणार; आगामी चित्रपटाची प्रचंड उत्सुकता

एकाच चित्रपटानंतर बॉलिवूडला केलं बाय बाय, 50000 कोटींची मालकीण; जुही चावलाला संपत्तीत मागे टाकणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?
2

एकाच चित्रपटानंतर बॉलिवूडला केलं बाय बाय, 50000 कोटींची मालकीण; जुही चावलाला संपत्तीत मागे टाकणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.