tunisha sharma and sheezan khan
मुंबई – शिजानच्या फोनमधून डिलीट केले गेलेले मेसेज रिकव्हर करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शिजान खान ब्रेकअप झाल्यापासून तुनिषाला सतत दुर्लक्षित करत होता. रिकव्हर झालेल्या मेसेजमधून हा मोठा खुलासा झाला आहे. शिजान एकाच वेळी अनेक तरुणींच्या संपर्कात होता.
मीडिया रिपोर्टनुसार शिजान खानने त्याच्या फोनमधून डिलीट केलेले सगळे मेसेज पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. या मेसेजेसमधून असे लक्षात आले आहे की, शिजान तुनिषाकडे दुर्लक्ष करून इतर तरुणींसोबत गप्पा मारत होता. तर, तुनिषा त्याला अनेक मेसेज करून देखील तो तिला रिप्लाय देत नव्हता. त्याच्या फोनमधून अनेक महत्त्वाचे खुलासे झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी देखील केली आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्हाला साथ द्या, असे आवाहन तुनिषाच्या आईने चाहत्यांना केले. यावेळी तुनिषाच्या आईने आपल्या मुलीची हत्या झाल्याचा दावा केला आहे. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर तिचा देह शिजाननेच खाली उतरवला होता. मग, त्या १५ मिनिटांत काय झाले असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
शिझानला 14 दिवसांची कोठडी
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाने आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्याला वसई कोर्टात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती. आज त्याची पोलिस कोठडी संपत असतानाच न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान शुक्रवारी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत शिझान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.