siddharth menon and pallavi patil in premachi dastan
प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी ही वेगळीच असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) आणि अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांच्या प्रेमाची रोमँटिक दास्तान सुंदर अंदाजात लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘तेरी मेरी दास्तान’ (Teri Meri Dastaan) या हिंदी गाण्याच्या अल्बममधून हे दोघे आपल्या भेटीला येणार आहेत. या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून व्हिडिओ पॅलेस (Video Palace) हिंदी अल्बम निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.
‘तेरी मेरी दास्तान’ अल्बममधील गाणं काश्मीरमध्ये शूट झालं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे. अब्दुल शेख याने गायलेल्या या गाण्याला विदुर आनंद यांनी संगीत दिले आहे.
[read_also content=”महाराष्ट्रातूनच केंद्राला सर्वाधिक ‘जीएसटी’; गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक संकलन https://www.navarashtra.com/india/highest-gst-to-central-government-from-maharashtra-and-more-collection-than-last-year-nrgm-310809.html”]
या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीसा चुलबुला अंदाज पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक वेगळी गोष्ट असते. अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून उलगडणार आहे.
तेरी मेरी दास्तानच्या शूटिंग अनुभवाबद्दल बोलताना सिद्धार्थ आणि पल्लवी सांगतात की, ३ डिग्री तापमानात आम्ही हे शूट पूर्ण केलं असून ते आम्ही खूप एन्जॉय केलं. गाण्याची ही रोमँटिक सफर प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.