सलमान खानचा Sikandar रिमेक की ओरिजनल ? दिग्दर्शक ए.आर. मुरुगदासने जरा स्पष्टच सांगितलं...
सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता ट्रेलरनंतर चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात २५ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ए.आर.मुरुगॉदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ‘ईद’च्या मुहूर्तावर म्हणजेच ३० मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला ४ दिवस बाकी असतानाच चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच हजारो तिकीटांची विक्री झाली असून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे.
निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी, ‘बंजारा’चा अफलातून टीझर रिलीज!
चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या भाईजानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची क्रेझ फार मोठी आहे. ईदच्या निमित्ताने ३० मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. फक्त २४ तासांत म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाचे देशभरात ७६,२८८ तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखीन चार दिवस उपलब्ध आहेत. खरंतर कोणत्याही चित्रपटाच्या प्री- बुकिंगची सुरुवात जास्तीत जास्त दोन दिवसांपासूनच होते. ॲडव्हान्स बुकिंगची कमाई पाहता, असे दिसतेय की ‘सिकंदर’ पहिल्या दिवशी देशात ६० कोटींपेक्षा अधिकची बंपर कमाई करू शकते.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अॅडव्हॉन्स बुकिंग सुरू होताच ‘सिकंदर’ चित्रपटाच्या 2D व्हर्जनमध्ये ७६ हजार ००६ तिकिटांची विक्री झाली आहे. आयमॅक्स 2D व्हर्जनमध्ये ४५ हजार ९४ तिकिटं विकली गेली आहेत. संपूर्ण देशभरात काही तासांतच ६७ हजार २७६ तिकिटांची विक्री झाली आहे, त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘सिकंदर’ चित्रपटाने आतापर्यंत ६.११ कोटींची कमाई केली आहे. बुधवारी दुपारपर्यंत देशभरात ‘सिकंदर’च्या ९४७५ शोसाठी आगाऊ बुकिंग केली गेली आहे. राखीव जागा म्हणजे ज्या थिएटरमध्ये रिलीजच्या तारखेला ऑन-स्पॉट बुकिंगसाठी राखीव ठेवल्या जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटामधील दमदार म्युझिक लाँच
पहिल्या दिवसाच्या प्री- बुकिंगमध्ये, दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक तिकिटे विकली गेली. तिथून ४४.५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर राखीव जागांमधून मिळणारे उत्पन्न १.१७ कोटी रुपये आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो, जिथून ४२.५९ लाख रुपयांची प्री- बुकिंग झाली आहे. राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे १८.९८ लाख रुपयांची प्री- बुकिंग झाली आहे. पश्चिम बंगाल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे १४.७९ लाख रुपयांची प्री- बुकिंग झाली आहे. तर उत्तर प्रदेश १२.५४ लाखांच्या प्री- बुकिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
‘सिकंदर’ हा चित्रपट रविवारी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. यामागील निर्मात्यांची रणनीती अशी आहे की रविवारी साप्ताहिक सुट्टीचा फायदा मिळेल. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सणही साजरा केला जातो. तर ईद ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अशा परिस्थितीत, रमजानमध्ये महिनाभरापासून थिएटरपासून दूर असलेल्या सलमान खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी असेल. देशाच्या अनेक भागात ईदनंतर ४ एप्रिलपर्यंत उत्सव सुरू राहतात. याचा फायदा चित्रपटालाही होईल आणि त्यानंतर ५-६ एप्रिल रोजी शनिवार-रविवारचा वीकेंड असेल.
‘सिकंदर’ चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. यामध्ये सलमान खानच्या फी समाविष्ट नाहीत. सलमान खान, रश्मिका मंदान्ना, सत्यराज आणि काजल अग्रवाल यांच्याशिवाय या चित्रपटात शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि अंजिनी धवन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या रविवारी, २३ मार्च रोजी प्रदर्शित झाला, जो २४ तासांत युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर ८१ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला.
‘पिंकव्हिला’च्या मते, ‘सिकंदर’च्या नॉन-थिएट्रिकल हक्कांसाठी म्हणजेच डिजिटल (ओटीटी रिलीज), सॅटेलाइट (टीव्ही प्रीमियर) आणि म्युझिकल राईट्ससाठी तब्बल १६५ कोटी रुपयांचा करार झाला आहे. नेटफ्लिक्सने ८५ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीत ओटीटी रिलीजचे राईट्स विकत घेतले आहेत. या करारात असेही म्हटले आहे की जर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली तर ओटीटी रिलीजसाठी हा करार १०० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो.