गायक हिमेश रेशमिया कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे निधन, वयाच्या 87 व्या घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य- सोशल मिडीया)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. विपिन रेशमिया यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत संगीत दिग्दर्शक आणि निर्माते विपिन रेशमिया यांनी काल 18 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे हिमेश रेशमिया आणि त्याच्या संपूर्ण कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
हेदेखील वाचा- Deepika Padukone : दीपिकाने आई झाल्यानंतर घेतलं नवीन घर, घराची किंमत…
संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला होता, त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटीज आणि कलाकरांनी त्यांना सोशल मिडीयावर श्रध्दांजली वाहिली आहे.
हिमेश रेशमिया आपल्या वडिलांना आपला गुरु मानत होता. तो त्याच्या वडीलांच्या अगदी जवळ होता. वडिलांच्या निधनानंतर हिमेश रेशमियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिमेशच्या वडिलांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या होत्या. हिमेशचे वडील विपिन यांच्या पार्थिवावर आज 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिमेशने आपल्या वडिलांना आपले गुरू मानले आणि त्यांना ‘देव’चा दर्जा दिला. हिमेश आणि त्याच्या वडीलांचे नाते अगदी घट्ट होते. दोघांनाही संगीताची आवड होती.
हेदेखील वाचा- Sai Tamhankar Exclusive : इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून सई काय शिकली ? म्हणाली…
हिमेश रेशमियाची फॅमिली फ्रेंड फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी त्यांचे वडील विपिन रेशमिया यांच्या निधनाची पुष्टी केली आहे . वनिता थापर यांनी सांगितलं आहे की, विपिन रेशमिया यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ते टीव्ही मालिका बनवत असताना मी त्यांना पापा म्हणत असे. नंतर, ते संगीत दिग्दर्शक बनले आणि त्यानंतर हिमेशने त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. विपिन रेशमिया एक आदर्श व्यक्तिमत्व होते. मला खूप वाईट वाटत आहे. ते आता या जगात नाही यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आमचे नाते 20 वर्षे जुने होते. ते एक आश्चर्यकारक व्यक्ती होते, त्यांची विनोदबुद्धी देखील आश्चर्यकारक होती. संगीताच्या बारीकसारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले. हिमेशने जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तो म्हणायचा की मला ही धून सापडली आहे. हिमेशला ते नेहमी सांगत होते की हे कर, त्याने तसं करावं.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमेशच्या वडिलांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना रुग्णालयात कधी दाखल करण्यात आले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 18 सप्टेंबर (बुधवार) रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (2014) आणि तेरा सुरूर (2016) मध्ये निर्माता म्हणून काम केले होते. त्यांचा मुलगा हिमेश रेशमिया या चित्रपटांमुळे चर्चेत आला. विपिनने इन्साफ का सूरज (1990) नावाच्या रिलीज झालेल्या चित्रपटासाठी संगीत दिले. सलमान खानच्या चित्रपटातही विपिन रेशमियाने संगीत दिले आहे. यादरम्यान त्यांची भेट हिमेश रेशमियाशी झाली. यानंतर सलमानने हिमेश रेशमियाला त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. अशा रीतीने सलमान आणि हिमेश रेशमिया यांच्यात खोलवर नाते निर्माण झाले. इंडियन आयडॉल 12 च्या दरम्यान हिमेश आपल्या वडिलांबद्दल बोलत होता.