इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून सई काय शिकली ? म्हणाली...
Sai Tamhankar Exclusive Interview : अभिनेत्री सई ताम्हणकर हिची मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे, लूकमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सध्या सई तिच्या ‘मानवत मर्डर’ सीरीजमुळे चर्चेत आली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला सईचा हा अपकमिंग प्रोजेक्ट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सईने या सीरीजमध्ये समिंद्री नावाचे पात्र साकारले आहे. सीरीजच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने शुटिंग दरम्यान इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींकडून शिकलेल्या गोष्टींवर भाष्य केलं आहे.
हे देखील वाचा – मॉडर्न सई कशी बनली ‘मानवत मर्डर’ मधील समिंद्री? वेगळ्या धाटणीच्या भूमिकेबाबत सईचा उत्साह
इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांसोबत काय शिकला
मुलाखती दरम्यान, सईने ‘मानवत मर्डर’च्या शुटिंग दरम्यान इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता ? त्यासोबतच त्यांच्याकडून शिकायला काय काय मिळालं ? सईला असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नाचं उत्तर देताना सई म्हणाली, “मला वेबसीरीजचं शुटिंग करताना इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून फार काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे, मकरंद अनासपुरेंकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. त्यांच्यासोबत काम करायला फार मज्जा आली. एकदा एक सीन झाला की ते फार चिल्ड राहायचे. दुसरा सीन येईपर्यंत ते कसलंच टेंशन घेत नाहीत. विशेष म्हणजे ते आपल्या भूमिकेचं केव्हाच टेंशन घेत नाहीत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी मी शिकत स्वत: मध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याकडूनही शिकण्यासारखं खूप काही आहे.”
काय आहे कथा?
जादूटोणा, खून आणि रहस्य अशी कथा असलेल्या ह्या सीरीजची कथा मानवत गावातील आहे. १९७२ साली मानवत गावात दीड वर्षांत सात जणांचा खून झालेला असतो. या मर्डर मिस्ट्रीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका खूनाचा शोध या सीरीजमधून घेण्यात येणार आहे. सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टारकास्ट या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे, सीरीजमध्ये प्रेक्षकांना मराठमोळ्या कलाकारांचा केव्हाही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे. सीरीजचं दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केलं असून सीरीजची निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी केली आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत पाहायला मिळणार आहे.