Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलील कुलकर्णींनी लेकीसाठी वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”

राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संगीतकार, गीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांची मुलगी अनन्या हिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 22, 2024 | 05:29 PM
सलील कुलकर्णींनी लेकीसाठी वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”

सलील कुलकर्णींनी लेकीसाठी वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट, म्हणाले, “माझ्या जीवाची सावली…”

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संगीतकार, गीतकार आणि गायक सलील कुलकर्णी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारे गायक सलील कुलकर्णी सध्या त्यांच्या खासगी आयुसष्यामुळे चर्चेत आले आहेत. ते कायमच इन्स्टाग्रामवर कामासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतीतही पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात. नुकतीच त्यांची मुलगी अनन्या हिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर सुंदर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

किरण मानेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’ला दिली भेट; पोस्ट शेअर करत म्हणाला, “सांगितल्या दिवशी दारात गाडी…”

सलील कुलकर्णी यांनी मुलगी अनन्याच्या बालपणींपासूनचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “आमची अनन्या… आज अठरा वर्षांची झाली… आता मला पुन्हा हळूहळू लहान व्हायला हरकत नाही… आता दोन दोन आई आहेत मला… पण… इतक्या लवकर झालीस मोठी… अगदी अगदी आत्ता आत्तापर्यंत तर शाळेत जातांना, एकदा मोज्याच्या आतला दोरा टोचतोय… एकदा ड्रेसचं लेबल टोचतंय… हे नीट करून दे… तरच मी शाळेत जाईन म्हणणारी… आणि मी सगळं आवरून खाली जात नाही… तोपर्यंत दादाने पण जायचं नाही… असे रोज नवे नवे हट्ट करणारी माझ्या जीवाची सावली.”

पुढे सलील कुलकर्णींनी लिहिलं, “आता एकदम समजूतदार, शहाणी आणि जिथे फोकस करेल ते उत्तम करणारी अनन्या कधी झाली… कळलं सुद्धा नाही… कोणत्याही सहलीला अगदी आमच्या अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा एकदाही माझ्या कडेवरून न उतरलेली… कमीत कमी बोलून अख्ख्या कुटुंबाच्या हास्याचा रिमोट जिच्या हातात आहे… ती अनन्या… क्रिकेट मॅचेसला एकटी जाऊन राहते, खेळते… कधी सिलेक्ट नाही झाली तर तिची तिची समजून घेते… एवढी मोठी झाली?”

 

“गाणं, वादन, उत्तम येत असूनही फक्त मोजक्या २-३ लोकांसमोर सादर करणारी… आणि माझं क्रीडापटू होण्याचं स्वप्न क्रिकेटर होऊन पूर्ण करणारी अनन्या… शुभंकरने त्याच्या कॉन्सर्टला काय कपडे घालावेत इथंपासून… सगळे निर्णय जिला विचारूनच घ्यावेसे वाटतात अशी आजीची सर्वात लाडकी नात… आपण सगळे एका दिवसात बोलतो तेवढं पंधरा दिवसांत बोलणारी मितभाषी कन्या हृदयनाथजींपासून सगळ्यांची लाडकी आहे… बस एक स्माईल ही काफी है…” असं सलील यांनी लिहिलं.

“अनन्या, प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे… किंवा मग तुझा मुलगा तरी… पण तू आणि शुभू माझ्याबरोबरच होतात अनेक जन्म आणि असणारच… खूप खूप मोठी हो… तुझ्या प्रत्येक मॅचमध्ये तू बॉल टाकायला धावत येशील तेव्हा तुझा बाबा पण मनातून तुझ्यासाठी धावेल… कायम हसत राहा… खूप खूप आशीर्वाद… तुझा बाबा,” सलील कुलकर्णींच्या ही सुंदर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘पुष्पा २’ची वेळ आणखीन २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसोबत चित्रपट थिएटरमध्ये कधी रिलीज होणार?

Web Title: Singer saleel kulkarni shared special post for daughter ananya on her birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • saleel kulkarni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.