(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ ५ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट रिलीज होऊन १७ दिवस झाले असले तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आले आहे. ज्यांनी अजूनही ‘पुष्पा २’ चित्रपट पाहिला नसेल, त्यांच्यासाठी ‘गुड न्यूज’ आहे. ‘पुष्पा २ द रुल’ चित्रपटामध्ये निर्मात्यांकडून आणखीन २० मिनिटं ॲड केली गेली आहेत, लवकरच नव्या फुटेजसोबत चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे.
शाहरुख खानला कोणत्या नावाने इतर सेलिब्रिटी चिडवायचे, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा…
मुव्ही फिड बॉलिवूडने दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट सध्या ३ तास २० मिनिट इतका लांबीचा आहे. सध्या चित्रपटाला देशासह परदेशातही जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटामध्ये आणखीन २० मिनिटे वाढणार आहेत. म्हणजेच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट तब्बल पावणे चार तासांचा असणार आहे. याचाच अर्थ हा चित्रपट ३ तास ४० मिनिटांचा असणार आहे. २० मिनिटांची नवीन फुटेजेस प्रेक्षकांना चित्रपटामध्ये २५ डिसेंबरपासून अर्थात ख्रिस्तमसच्या मुहूर्तावर पाहता येणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी; भोपाळची ‘ही’ तरुणी तुम्हाला माहितेय का ?
अजूनही रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर कमाईचा आकडा गाठत असताना ‘पुष्पा २’ Extended cut सह रिलीज झाल्यावर वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ला ‘पुष्पा २’चं तगडं आव्हान असेल. कारण ‘पुष्पा २’चा Extended cut आणि वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ एकाच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा २’ आणि वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’मध्ये कोणता चित्रपट बाजी मारणार ? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.