
सनी लिओनीने आतापर्येंत अनेक चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच तिचे सगळे चित्रपट हे ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत. अभिनय क्षेत्रात उत्कृष्ट अभिनेत्री तर ती आहेच पण त्याचबरोबर एक उद्योजकसुद्धा आहे. सनी लिओनने हिंदी आणि OTT वरील अनेक शो जज म्हणून केले आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेडे केले आहे. तसेच सनी ही उत्कृष्ट मॉडेलसुद्धा आहे. तिने अनेकदा आपले मॉडेल्स फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सनीने नुकतेच तिचे रॅम्पवॉल्क वरील फोटोज शेअर केले आहे. मणिपूर मधील दिल्ली टाइम फॅशन वीक या शोमध्ये तिने लाल भडक रंगाचा ड्रेस परिधान करून या फोटोजमध्ये ती रॅम्पवॉल्क करताना दिसत आहे.
हा ड्रेस अलीमुद्दीन एमडी याने डिजाईन केला असून, सनी या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
तिने या फॅशन शो मध्ये अलीमुद्दीन आणि दया ओनिअम यांच्यासोबत रॅम्पवॉल्क करताना दिसत आहे. तिने या रॅम्पवॉल्क मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पोज देऊन चाहत्यांना वेडे केले आहे.
लाल-गुलाबी रंगाचा लांबलचक ड्रेस घालून ती रुबाबात चालत येणार सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर तिने आपला मेकअपही साधा पण रेखीव केला आहे.
या ड्रेसला मागून मोठी झालर असल्यामुळे ती एकदम क्वीन दिसत आहे. तिचा ब्लाउसची नेकलाईन ही व्ही आकारात असून तिच्या कंबरेला टाईट करण्यासाठी काळी जाळीदार रिबीन आहे.
सनी लिओनीने या ड्रेसवरील लुक पूर्ण करण्यासाठी तिने , न्यूड आयशॅडो, वन लाईन आयलायनर, हाय मस्कारा, जाडसर कोरलेल्या भुवया, गालावर लाल हायलायटर आणि लाल शेडची लिपस्टिक लावत तिने रेखीव आणि आकर्षक लुक कॅरी केलाय.