मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) पुन्हा एकदा नव्या चित्रपटात झळकणार आहे. तमन्ना भाटिया आगामी ‘बबली बाउन्सर’ (Babli Bouncer) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले आहे. मात्र, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney +Hotstar) प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची रिलीज डेटही (Release Date) समोर आली आहे. ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्याची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. तमन्नाचा चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात तमन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. स्टार स्टुडिओ आणि जंगली पिक्चर्सने याची घोषणा केली आहे.
तमन्ना भाटिया दीर्घ काळानंतर चित्रपटात कमबॅक करत आहे. आता तमन्ना भाटिया बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे. तमन्ना भाटिया मधुर भांडारकरच्या ‘बबली बाउन्सर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर तमन्ना नखरेल अवतारात दिसणार असल्याचे दिसते. डिस्ने प्लस हॉटस्टारने या चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ओये बावले सुना क्या? बबली बाउन्सरची वेळ आली आहे! तो अनेक मने जोडण्याचे काम एकत्र करेल की अनेकांची हाडं खिळखिळी करणार? लवकरच कळेल! ‘बबली बाउन्सर’ हा चित्रपट २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Oye bawale suna kya? Aa gaya hai Babli Bouncer ka time! Dilon ko yeh jodegi, ya khub hadiyaan todegi? Pata chalega jald hi! ❤️🔥 Here’s the first look of #BabliBouncer, starring the phenomenal @tamannaahspeaks Streaming from Sept 23 only on #DisneyPlusHotstarMultiplex pic.twitter.com/JoArQgb3gG — Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) July 20, 2022
तमन्ना भाटिया पहिल्या लूकमध्ये एका दमदार भूमिकेत दिसत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या लूकनुसार, तमन्नाने काळी पँट आणि शर्ट घातला आहे आणि तिचे दोन्ही हात वर करून ती तिची ताकद दाखवताना दिसत आहे. या फोटोत ती हसत आहे. तमन्नाचा नवा लूक खूपच दमदार दिसत आहे. तमन्नाच्या या खास स्टाइलमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.
तमन्ना भाटियाचा आगामी चित्रपट ‘बबली बाउन्सर’ उत्तर भारतातील खऱ्या ‘बाउन्सर टाउन’ असोला फतेपूरवर आधारित आहे. या चित्रपटातील अभिनेत्री तमन्नाची ‘बबली बाऊन्सर’ची भूमिका पूर्णपणे वेगळी असणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘बबली बाऊन्सर’ची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि जंगली पिक्चर्स यांनी केली आहे. या चित्रपटात तमन्ना व्यतिरिक्त सौरभ शुक्लासोबत अभिषेक बजाज आणि साहिल वैद हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.