फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूडमधील टॅलेंटेड आणि गॉर्जियस अभिनेत्री क्रिती सॅनॉन आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. २७ जुलै १९९० रोजी दिल्लीमध्ये जन्मलेली क्रिती सॅनॉननेइंजिनियरिंग विद्यार्थिनीपासून करिअरची सुरुवात केली होती. पण क्रितीचे खरे ध्येय मुंबईच्या फिल्मी वातावरणात दरवळत होते. पुढील काहीच वर्षात बॉलीवूडच्या चमचमीत दुनियेत पाय ठेवत तिने सर्वांना आपलं बनवलं आहे.
क्रितीने आपल्या करिअर सुरुवात जरी दाक्षिणात्य सिनेमांमधून केले असले तरी तिने तिच्या बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात टायगर श्रॉफसोबत २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून केली. पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. याच चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर बेस्ट डेब्यू’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटातील तिचे डायलॉग्स आजही अजरामर आहेत.
त्यानंतर क्रितीने ‘दिलवाले’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘मिमी’, ‘भेडिया’, ‘शहजादा’, ‘आदिपुरुष’ अशा विविध चित्रपटांतून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. विशेषतः ‘मिमी’ या चित्रपटात तिने सरोगसी आईची भूमिका साकारत तिच्या अभिनयाचं खरंखुरं कौतुक झालं. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला, जो तिच्या अभिनय कारकिर्दीतील एक मोठा टप्पा ठरला.
फक्त सिनेमांपुरतीच नव्हे, तर ब्रँड एंडोर्समेंट, फॅशन, सोशल मीडियावर सक्रियता आणि स्वतःचं स्किनकेअर ब्रँड सुरु करून ती उद्योजिका देखील बनली आहे. सोशल मीडियावर तिच्या फॅन्सची संख्याही प्रचंड आहे. तिचा साधेपणा, आत्मविश्वास आणि मेहनत ही तिची खरी ओळख ठरली आहे. तिच्या सौंदर्यच्या चर्चा आता सात समुद्र पार होतात. अभिनेत्रीचा काही महिन्यांआधी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘दो पत्ती’ या वेब फिल्मने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. तसेच क्रितीच्या आगामी प्रोजेक्टविषयी तिच्या चाहत्यांना फार उत्सुकता लागून आहे.
क्रिती सॅनॉनची ही प्रवासगाथा हीरोपंतीपासून दो पत्तीपर्यंत एक प्रेरणादायी आणि यशस्वी सफर आहे. तिचा वाढदिवस हे निमित्त आहे तिच्या या चमकदार प्रवासाला सलाम करण्याचं!