फोटो सौजन्य – Instagram
मुक्काबाज त्याचबरोबर गॅंग ऑफ वासेपुर सारख्या प्रसिद्ध सिरीज मधील प्रभावी भूमिकांसाठी ओळखला जाणारे विनीत कुमार सिंह हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्याची छाप पाडली आहे. ओटीटीचा स्टार प्रसिद्ध अभिनेता विनीत कुमार सिंग आणि त्याची पत्नी रुचिरा गोरमारे यांनी २४ जुलै रोजी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने आज 27 जुलै रोजी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आज त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याचे चाहत्यांसाठी आनंदाचे बातमी शेअर केली आहे. अभिनेताने या हृदय फरशी पोस्टला सुंदर कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, देवाची दया ओसंडून वाहते! जग सोडून जा, सर्वात लहान सिंग आला आहे आणि तो आधीच हृदये आणि दुधाच्या बाटल्या चोरत आहे. आनंदाच्या या मौल्यवान छोट्या गठ्ठ्याबद्दल देवाचे आभार! असे सुंदर कॅप्शन त्याने लिहीले आहे.
अभिनेत्याने शेअर केलेला पोस्ट खाली अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विक्रांत मेसीने अभिनंदन केले आहे. ज्यावेळी विक्रांत मेसीने अभिनंदन करताना लिहिले आहे की, खूप खूप अभिनंदन भाऊ, तर अहान कुमार याने लिहिलंय आहे की, तुमच्या दोघांसाठी ही खूप चांगली बातमी आहे त्याला लहान मुलाला भेटण्याची मला उत्सुकता आहे.
अभिनेता विनीत कुमार आणि त्याची पत्नी रुचिरा यांनी मे महिन्यामध्ये ते गरोदर असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी खास पोस्ट शेअर करून ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले होते की, “नवे जीवन आणि आशीर्वाद! विश्वाकडून, प्रेमाने… बाळ लवकरच येत आहे!! नमस्ते, लहान बाळा!!! आम्ही तुमचे स्वागत करण्यास तयार आहोत”, असे त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे.
विनीत कुमार सिंग यांनी त्याच्या कामगिरीने त्याच्या म्हणजेच त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याने शेवटचा छावा मध्ये देखील खूप सुंदर असे अभिनय केले होते. विकी कौशल्याचा प्रसिद्ध सिनेमा छावा या सिनेमांमध्ये त्याने चंदोगमत्य कवी कलश यांची भूमिका साकारली होती.