Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६२ व्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत आदित्य सरपोतदार यांचा ‘उनाड’

जिओ स्टुडिओज आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'उनाड' हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( Zlin International Film Festival), युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2022 | 02:11 PM
६२ व्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत आदित्य सरपोतदार यांचा ‘उनाड’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जिओ स्टुडिओज आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘उनाड’ हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival), युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, ‘महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात ‘उनाड’ ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून, या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात ‘उनाड’ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.’

‘उनाड’ ही महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील तीन तरुण मुलांची कथा आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र आहेत, जे आपला वेळ गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नाही. स्थानिक त्यांना गावातील उनाड मुले समजत असल्याने, तिन्ही मुले अडचणीत येतात. त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची ही कहाणी आहे, जी त्यांना कायमची बदलते.

झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे ८१ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला जगातील ५२ देशांतील ३१० चित्रपटांचा समावेश होता.

Web Title: Unad movie in zlin international film festival competition nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • aditya sarpotdar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.