
urfi javed
उर्फी जावेद (Urfi Javed) आणि वाद (Controversy)हे आता समीकरणच झालं आहे. कपडयांवरुन नेहमी ट्रोल होणारी उर्फी नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडते. तरीही कुणालही न घाबरणारी उर्फी आपल्या दैनंदिन आयुष्यात तिला जे हवं तेच करते. आता मात्र, ट्रोलींग आणि एकंदरीत तिच्या करियरवर झालेला परिणाम याबद्दल उर्फी स्पष्टच बोलली. लोक तिचा आदर करत नाहीत आणि त्यामुळे तिच्यासोबत काम करणे टाळातात असं अशी खंत तिने बोलून दाखवली आहे.
[read_also content=”प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर पोलीस कर्मचाऱ्याने टाकलं पाणी, ही काय पद्धत आहे? लोकांनी व्यक्त केला संताप https://www.navarashtra.com/crime/netizens-are-getting-angry-after-watching-video-of-a-policeman-threw-water-on-people-sleeping-on-the-platform-nrps-427303.html”]
उर्फी जावेदला कुठल्याही परिचयाची गरज नाही. बिनधास्त राहणाऱ्या उर्फील सोशल मिडिया ट्रोलर्स मोठ्या प्रमाणावर ट्रोल करतो. याबाबत बोलताना ती म्हणाली की, “मी लोकप्रियता मिळवली आहे? पण लोक माझा आदर करत नाहीत. लोक माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत,” हो “मी लोकांच लक्ष वेधून घेते. लोकांनी माझ्याकडे लक्ष द्याव म्हणून मी असे कपडे घालते.”
यावेळी तीने ट्रोलर्सबद्दल बोलताना म्हण्टलं की तिच्यावर होणाऱ्या ट्रोलींगमुळे तीला वाईट वाटतं. ट्रोलींगमुळे ती अस्वस्थ होते. “मी माणूस आहे म्हणून मी अस्वस्थ होते. पण हे सगळं फार काळ मी माझ्या मनात टिकू देत नाही. मी परत नॅार्मल होते आणि स्वतःला सांगते की ते कदाचित खूप कुरुप आहेत, कदाचित तू खूप सुंदर आहेस.”
उर्फी जावेदने सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि टीकेबद्दल बोलण्याचीही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही एका मुलाखतीत उर्फीने कबूल केले की ट्रोलिंगचा तिच्यावर परिणाम होतो. ती म्हणाली की, ट्रोल्सच्या भाषेत, ते म्हणतात त्याप्रमाणे, कदाचित मी एक स्त्री म्हणून चांगली नाही, कदाचित मी समाजावर एक डाग आहे, कदाचित मी तरुण पिढीसाठी एक वाईट उदाहरण आहे. क्या मै इतनी बरी हूं? (मी इतकी वाईट आहे का?) कदाचित कोणीही मला स्वीकारणार नाही, कोणीही कुटुंब मला स्वीकारणार नाही,” असंही ती म्हणाली.