8 वर्षांचा संसार आता मोडणार! अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांचा घटस्फोट? कारण गुलदस्त्यात
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र तरी देखील ती सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते आणि तिच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींबद्दल तिच्या फॅन्सला अपडेट देत असते. मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी देखील उर्मिला नेहमी चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ई टाइम्स सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा पती मोहसिन अख्तर यांनी त्यांच्या घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
हेदेखील वाचा- ऐश्वर्या रायला टक्कर देत अभिनेत्री प्रिया बापटने IMDbच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत मिळवले स्थान!
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर या दोघांच्या घटस्पोटामुळे आता बरीच चर्चा सुरू आहे. 8 वर्षांपूर्वी उर्मिला आणि मोहसिन यांचं लग्न झालं होतं. मात्र आता या दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या घटस्पोटामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. उर्मिला आणि मोहसिन यांच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे त्यांच्या फॅन्सना धक्का बसला आहे. उर्मिलाला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करून चित्रपटांमध्ये परतायचे आहे, असं तिच्या फॅन्सचं म्हणणं आहे. मात्र घटस्फोटामागचं खरं कारण अद्याप अभिनेत्रीने जाहीर केलेलं नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- World Bollywood Day 2024: भारतीय चित्रपटसृष्टीचा जागतिक विस्तार आणि त्याचा परिणाम
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. उर्मिला आणि मोहसीन यांनी लग्नानंतर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले होते. या दोघांची भेट डिझायनर मनीष मल्होत्रामुळे झाली. मनीष हा दोघांचा कॉमन फ्रेंड आहे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर या दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचे अंतर आहे. उर्मिला मातोंडकर तिचा पती मोहसीन अख्तरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. मोहसिन अख्तर मीर जेव्हा मुंबईत मॉडेलिंग करण्यासाठी आला तेव्हा तो उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात पडला होता. मोहसीन अख्तर मीर हा काश्मीरचा रहिवासी आहे, एक बिझनेसमन आणि मॉडेल आहे.
उर्मिला आणि मोहसीन बऱ्याच काळापासून एकत्र राहत नाहीत, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता उर्मिलाने मोहसीनसोबतचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वीच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, दोघे का वेगळे होत आहेत याचे कारण अद्याप समोर आले नसून, हा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याचे बोलले जात आहे.
उर्मिला आणि मोहसीन यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. उर्मिला आणि काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन यांनी आठ वर्षांपूर्वी अचानक अत्यंत साधेपणाने लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मोहसीन अख्तर मीरने उर्मिला मातोंडकरला प्रपोज केले होते. उर्मिला मातोंडकरने धर्माचे सर्व अडथळे तोडून मोहसिन अख्तर मीरचे प्रेम स्वीकारले. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांनी वेगवेगळ्या धर्माचे असूनही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता हा 8 वर्षांचा संसार मोडणार आहे. या घटस्फोटामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र आता जोपर्यंत अभिनेत्रि स्वत: या सर्व गोष्टींबाबत खुलासा करत नाही, या घटस्फोटामागचं कारण समजू शकणार नाही.