जबरदस्त.... ऐश्वर्या, करीना अन् तृप्तीला मागे टाकत प्रिया बापटची व्हिक्टरी, 'या' यादीत अभिनेत्री आघाडीवर
या आठवड्यात, प्रिया बापटने आयएमडीबी च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवा है’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा शो मुलांचे संगोपन करण्याच्या आव्हानांना सामोरी जाणाऱ्या तीन चांगल्या मित्रांच्या कथेवर केंद्रित आहे. तसेच ही सिरीज लवकरच सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार असून, अनेक कलाकार या मालिकेत काम करताना दिसणार आहे.
तसेच, अभिनेत्री प्रिया बापटने आता IMDbच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरी बाजी मारली आहे. हा आनंद व्यक्त करत प्रिया म्हणाली, “आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली हि एक पावती आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी असलेल्या माझ्या रिलीजेस साठी मी खूप उत्सुक आहे. हे सर्व रिलीजेस खूपच छान आहेत आणि त्यावर देखील प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.
दरम्यान, ‘तुंबाड’ पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये परत आणत नायक सोहम शाहने या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मसेने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर ३६’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत ९ वे स्थान मिळविले आहे, तर त्याचा सहकलाकार दीपक डोबरियाल ३७ व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटासाठी अभिनेत्री ८ व्या स्थानावर आहे. तसेच यामधील सहकलाकार राजकुमार राव २१ व्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा- चर्चा बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हाणकरच्या नव्या फोटो शुटची!
ईशान खट्टरने त्याचा पहिला क्रमांक सलग तिसऱ्या आठवड्यात कायम ठेवला आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, शाहरुख खान आणि सलमान खान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत.